उल्हासनगर मध्ये ठाणे जिल्हा भिम आर्मीची भव्य मेणबत्ती श्रद्धांजली सभा.

शिवसेना , मनसे , रिपाइं सह सर्वपक्षीय-पुरोगामी सामाजिक संघटनांचा सहभाग .

उल्हासनगर(प्रतिनिधी) :मनिषा वाल्मिकी हिची उत्तर प्रदेशातील जातीयवादी गावगुंडांनी अतिशय क्रूर आणि  निर्घृणपणे हत्या केल्यानंतर संबंध भारतातील मानवतावादी जनमन हेलावून गेलं आहे . संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद रावणजी आणि  राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर भाई विनय रतन सिंह जींच्या आदेशानुसार भिम आर्मीच्या वतीने संपूर्ण भारतात संवैधानिक आंदोलन उभारण्यात येऊन बहीण  मनिषा हिला मेणबत्ती श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
                 
भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर .राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा अंतर्गत उल्हासनगर शहराचे शहरप्रमुख .कुमारभाई पंजवाणी यांनी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता मेणबत्ती श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.

या  श्रद्धांजली सभेला उल्हासनगर महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व वरिष्ठ साहित्यिक , ज्येष्ठ पत्रकार तसेच अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष .दिलीप  मालवणकर , शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक शेखर यादव , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हासनगर शहराचे प्रमुख नेते .सचिन कदम युवा सेनेचे उल्हासनगर शहरप्रमुख .चांदपीर यांचे सह भिम आर्मीचे मुंबई प्रदेश संघटक भीमटायगर .किसनभाई ओव्हाळ , कल्याण लोकसभा क्षेत्राचे महासचिव .रविंद्र साळवे , शहर संघटक सचिव .अण्णासाहेब कांबळे , जिल्हा संघटक.जितेंद्र भोसले , वाल्मिकी समाजाचे कार्यकर्ते .जितू वाल्मिकी, भिम आर्मीच्या माया कांबळे , रिक्षा युनियनचे अश्विनी टपाल , मुकेश इंगळे , भिम आर्मीचे  नानासाहेब वानखेडे, शहर उपाध्यक्ष पप्पू आखाडे ,  अनिल महाजन , नंदुभाऊ साळुंखे  यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो नागरिक यांनी या  श्रद्धांजली सभेला उपस्थिती दर्शवली.या वेळी  राष्ट्रपतींना सह्यांचे निवेदन देण्यासाठी"स्वाक्षरी मोहीम" राबविण्यात आली आहे .

तर   उल्हासनगर शहरप्रमुख .कुमारभाई पंजवाणी यांनी आयोजित केलेल्या या  श्रद्धांजली सभेत भिम आर्मीचे भिमपँथर राजेश गवळी यांनी जातीयवादी विचारसरणीवर जबरदस्त प्रहार करीत "थुकता है भारत " या  कवितेचे वाचन करून मनिषा वाल्मिकी हिस श्रद्धांजली अर्पण केली.शेवटी दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली सभेची सांगता करण्यात आली 

संबंधित पोस्ट