
उल्हासनगरातील वालधुनी नदीवरील पुल धोकादायक .
- by Rameshwar Gawai
- Oct 06, 2020
- 799 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर कॅंप ३ येथिल संजय गांधी नगर जवळ वालधुनी नदीवर बनलेला फार जुनाट पुल हा अतिशय धोकादायक झाला असुन या पुलावर कोणता ही मोठा अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा या पुलाला तोडुन त्या जागी नवीन पुल बांधन्याची मांगणी संजय गांधी नगर चे शिवसेना शाखा प्रमुख नाशिरखान यानी महापालिका आयुक्ता कडे केली आहे.
उल्हासनगर कॅंप ३ येथुन संजयगांधी नगर मार्गे रेल्वे स्टेशन कडे जाण्या करिता वालधुनी नदीवर हा एकमेव पुल असुन या पुलावरुन रिक्षा चार चाकी गाड्या दुचाकी रेल्वे स्टेशन कडे जातात . परंतु हा पुल जुना असल्याने अत्यंत खराब झाला आहे . या पुलाच्या खालील नाल्या तुटल्या असुन दोन्ही कडील कठडे सुध्दा वाहुन गेले आहेत . त्यामुळे हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे . पावसात या पुलावरुन पाणी गेल्या वर संजय गांधी नगर चा संपर्क तुटल्या जातो . तर हा पुल सध्यस्थितीत कोणत्या ही वेळी तुटन्या ची शक्यता नाकारता येत नाही . तर उल्हासनगर रेल्वे स्टेशन कडे जाणारा हा एकमेव पुल असल्याने या पुलावरुन रोज रिक्षा चार चाकी गाड्या दुचाकी गाड्या जाणे येणे करतात . त्यामुळे या पुलावर अपघात होवु शकतो . त्यामुळे हा पुल महापालिकेने एकतर बंद करावा किंवा ताबडतोब तोडुन त्या जागी पुन्हा नव्याने उंच असा पुल उभारला पाहिजे . हा पुल अत्यंत कमकुवत झाला आहे . या पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत . त्यामुळे हा पुल लवकर तोडणे गरजेचे आहे. कारण या पुलावर केव्हा ही मोठा अपघात होवु शकतो . म्हणुन महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी सदर पुला कडे लक्ष देवुन या पुलाला तोडुन त्या जागी नवीन पुल बांधावा अशी मांगणी संजय गांधी नगरचे शिवसेना शाखा प्रमुख नाशिर खान यानी केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम