शेतकरी वाचवा देश वाचवा आणि हाथरस घटनेचा निषेध करत कॉंग्रेसचे आंदोलन .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आणि हाथरस येथे मनिषा वाल्मिकी या तरुणीवर झालेला अमानुष  अत्याचार या घटनेचा निषेध करन्यासाठी महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव तथा उल्हासनगर  प्रभारी   राणी अग्रवाल यांचे मार्गदर्शना खाली  उल्हासनगर  शहर जिल्हा  काँग्रेसच्या वतीने . राधाचरण करोतीया अध्यक्ष उल्हासनगर  शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.  कार्याध्यक्ष मोहन साधवाणी  यांच्या  नेतृत्वाखाली तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे.  समन्वयक किशोर केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत . प्रांतअधिकारी कार्यालय उल्हासनगर ३ व तहसिलदार कार्यालय उल्हासनगर ५  येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे . या आंदोलनात मनिषा वाल्मिकी अत्त्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करत गुन्हेगारांना फाशी द्यावी असी मागणी करुन   तहसिलदार यांना आँल इंडिया वर्कस काँग्रेस कमिटी . महिला काँग्रेस कमिटी  उल्हासनगर  शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.  अनूसुचित जाती विभाग  यांच्या वतीने  निवेदन देण्यात आले  . त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमाना  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेस जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार महेश मिरानी नगर सेविका गटनेत्या सौ .  अंजलीताई  साळवे.   माजी महापौर मालती करोतीया.  महिला अध्यक्षा सुजाता शास्त्री.   ब्लाँक अध्यक्ष किशोर धडके . महासचिव तथा अनूसुचित जाती विभाग अध्यक्ष  दिपक सोनोने . विद्यार्थी आघाडी अध्यक्ष- रोहित आव्हाड.   महिला कार्याध्यक्ष विजया शिंदे . डाँ आजाद.  भागवत तायडे . संदीप बिरारे . सचिन गांधी .  प्रवक्ता राजेश  मनोत्रा.  नारायण गेमनानी .    सेवादल उपाध्यक्ष अनिल यादव.    स्वय  रोजगार अध्यक्ष गणेश मोरे ओ बी सी सेल  अध्यक्ष सुरेश काजळे.   बाबु आढाव.  दयानंद अडसुळ.  विशाल सोनवणे.   नरेन करोतीया . अनिल धूळे.  योगेश शिंदे.  ज्ञानेश्वर गायकवाड . संदीप शिंदे.  अशोक पाल आणि  सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट