डॉक्टर नसल्याने राज्य कामगार विमा रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग बंद . रुग्णांंचे हाल..

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर  येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचारी  उपलब्ध नसल्याने गेल्या सहा महीन्या पासुन बाह्य रुग्ण विभाग व इतर महत्त्वाचे विभाग बंद असल्याने गोर गरीब कामगार रुग्णांंना उपचार मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.सदर रुग्णालयात त्वरीत डॉक्टर व कर्मचारी  उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.विलास डोगरे यांनी महापालिका  आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

उल्हासनगर कँम्प.३ येथे  राज्य कामगार विमा योजना रुग्णालय असुन येथे उल्हासनगर व आजुबाजुच्या विभागातुन शेकडो गोर गरीब कामगार रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येतात.परंतु या रुग्णालयातील डॉक्टर,नर्स,व सर्व कर्मचारी  महानगरपालिकेने कोविड केअर सेंटर मध्ये वर्ग केला आहे.महाराष्ट्र राज्यात एकुण १२  राकावियो रुग्णालय हे डी सी एच सी   म्हणून घोषीत केले असुन सध्या हे रुग्णालय कोविड करिता  कार्यरत आहे.राज्यातील १२  रुग्णालयापैकी ११ रुग्णालयात राज्य विमा कामगारा  च्या रुग्णांंसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग  चालु करण्यात आला  आहे.मात्र उल्हासनगर येथिल या  रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग  उल्हासनगर महानगरपालिकेने बंद केला असल्याने  कामगार  रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.त्यामुळे  उल्हासनगर महापालिकेने त्वरीत या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरु करावा  अशी   मागणी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.विलास डोंगरे यांनी महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना   निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित पोस्ट