
खासगी फायनान्स कंपन्या विरोधात प्रांत अधिकारी यांना मनसेच्या वतीने निवेदन.
- by Rameshwar Gawai
- Sep 30, 2020
- 694 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात काही खासगी फायनान्स कंपन्या शीतल,उज्जैवन, कॅपिटल, स्वस्तिक सूर्योदय,जणलक्ष्मी,गणराज,बंधन,आर बी एल ,सहयोग हे शहरात महिलांचे गट निर्माण करून त्यांना घरगुती उद्योग करण्यासाठी काही कर्ज उपलब्ध करून देत असतात तसेच दर हप्त्याला आणि महिन्याला त्यांच्या कडून या कर्जाची वसुली केली जाते. परंतु २२ मार्च २०२० पासून कोरोनाच्या महाभयंकर आजाराचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा म्हणून सरकार ने केलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वांचेच सर्वच व्यवहार ठप्प झालेले आहेत,लहान-सहान घरगुती उद्योग बंद पडल्याने महिला गटांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास अडचणी येऊ लागल्याने सरकारने ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत या कर्जाच्या हफ्त्यांची वसुली करण्यास फायनान्स कंपन्यांना मनाई केले होती,परंतु आता हा मनाई आदेश संपुष्टात आल्याने या फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधिंनी महिलांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केले असल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज घेतलेल्या महिला वर्गामध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे. आणि उ द्योग-धंदा बंद झालेल्या पंढरपूर,जिल्हा सोलापूर येथील मनीषा अभय निकम या महिलेने कर्जाच्या हफ्त्यांच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केले आहे,असे अनुचित प्रकार भविष्यात टाळता यावे म्हणून या खासगी फायनान्स वाल्यांनी,पतपेढीवाल्यांनी लॉक डाऊन काळात महिला गटांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावू नये,तसेच
सर्व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी अजून ४/५ महिने लागणार असल्याने त्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू करावी सध्या कोणत्याच महिलांना कर्जाच्या परत फेडीसाठी त्रास देऊ नये तसेच लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी उद्योग धंदे पूर्णतः कोलमडले आहेत या आधीही या महिलांनी कर्जाचे हफ्ते वेळेवर भरलेले आहेत आणि काही महिन्यांची सवलत भेटल्यानंतर पुढेही कर्जाच्या हफ्त्यांची परतफेड या महिला ईमानदरीने करणार आहेत, शिवाय कर्ज घेता वेळेस विमा ही भरलेला असल्याने या संकट काळात या विम्याचा ही फायदा या महिलांना झालाच पाहिजे तसेच अद्यापपर्यंत कर्जाचा भरणा वेळेवर करणाऱ्या या महिला गटांना भविष्यात पुढील कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांच्या सबली करणासाठी ही चळवळ सुरू ठेवावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावर या महिला गटांच्या पाठीशी उभी राहणार आहे तसेच अरेरावी करणाऱ्या खासगी फायनान्स कंपन्यांच्या पत-पेढ्यांच्या विरोधात आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या विरोधात आक्रमक होऊन कायदा हातात घेण्यास ही मागे पुढे पाहणार नाही, मा.उप-जिल्हाधिकारी आणि पोलीस उप-आयुक्तांनी या महिला गटांना या बिकट काळात सहकार्य करावे आणि संबंधितांना या विषयावर कडक आदेश काढण्यात यावेत अश्या आशयाचे निवेदन उल्हासनगर मनसे चे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्या तर्फे प्रशासनाला देण्यात आलेआहे .यावेळी सह सचिव प्रवीण माळवे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष बादशहा शेख,अक्षय धोत्रे,उपविभाग अध्यक्ष जाफर शेख,शाखा अध्यक्ष मॅक्स लोखंडे तसेच मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम