चायनिजच्या दुकानात काम करणाऱ्या कारागीराची हत्या .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपाडा गांवातील एका चायनिज च्या दुकानात चायनिज बनवन्याचे काम करणारा कारागीर भरत परिहार(१८)  याचे अपहरण करुन त्याला जबरदस्त मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे . तेव्हा विठ्ठलवाडी पोलिसानी १० ते १२ अनोळखी इसमा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असुन पोलिस त्या आरोपींचा शोध घेत आहेत . 

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपाडा येथे राजु थापा व भरत परिहार हे दोघे चायनिज च्या दुकानात काम करत होते.भरत हा कारागीर असुन राजु हा मजुर म्हणुन काम करतो . दरम्यान २७ सप्टेंबर रोजी रात्रीचे एक वाजता त्या चायनिज च्या दुकानात १० ते १२ अनोळखी इसम घुसले व त्यानी भरत व राजु यास एका मोटर सायकल वर बसवुन नेवाळी कडे नेले व तेथेच भरत यास गाडी चोरल्याच्या कारणा वरुन जबर मारहाण  केली . नंतर  त्या दोघाना एका गाडीत बसवुन नांदिवली कडे नेले आणि तेथे राजु थापा याला सोडुन देवुन भरत यास ते घेवुन गेले आणि गाडीतच त्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केली . दरम्यान त्याचे शव गांवदेवी  गोट्स फार्म हाऊस च्या बोर्डाजवळ नेवाळी गांवा कडुन मांगरुळ गांवा कडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकुन दिले . दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसानी राजु थापा याच्या फिर्यादी वरुन १० ते १२ अनोळखी इसमा विरुध्द गैर कायद्यांची मंडळी जमवुन व मयताचे अपहरण करुन हत्या केल्याचा  गुन्हा दाखल केला आहे . तर या गुंह्यातील सर्व आरोपी अद्याप ही फरार असुन या  गुंह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे हे करत आहेत .

संबंधित पोस्ट