
डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडुन महापालिकेला ८ कार्डियक रुग्णवाहिका भेट .
- by Rameshwar Gawai
- Sep 29, 2020
- 465 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णाना रुग्ण सेवा देन्या करिता रुग्णवाहीका कमी पडु नये म्हणुन खा . डॉ . श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या वतीने ८ कार्डियक रुग्णवाहीका भेट दिल्या असुन त्या रुग्ण वाहिकेचा लोकार्पण बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उल्हासनगर ४ येथे संपन्न झाला आहे .
उल्हासनगर शहरातील कोरोना ग्रस्त रुग्णांची गैरसोय होऊ नये, आणि नागरिकांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी ८०% समाजकारण व २०% राजकारण या बाळासाहेबांच्या धोरणाप्रमाणे शिवसेना व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने कल्याण जिल्हाप्रमुख . श्री. गोपाळजी लांडगे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पाडण्यात आला आहे .
याप्रसंगी कल्याण उपजिल्हाप्रमुख मा. श्री. चंद्रकांतजी बोडारे,उल्हासनगर महापालिकेच्या महापौर लिलाबाई आशान, उपमहापौर भगवान भालेराव, महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी तसेच स्थानिक नगरसेविका सौ. वसुधा बोडारे, सौ. शीतल बोडारे व अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम