
फी न भरणाऱ्या विद्यार्थ्याना ऑन लाईन शिक्षणा पासुन वंचित ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे प्रशासनाधिकारी यांचे संकेत .
- by Rameshwar Gawai
- Sep 28, 2020
- 626 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रादुर्भावांने सर्वांचे रोजगार बुडाले असुन पालक आपल्या मुलांची फी देखिल भरु शकत नाहीत तेव्हा अशा विद्यार्थ्याना शाळा प्रशासनानी ऑन लाईन शिक्षण देन्याची मोहिम सुरु केली आहे . परंतु काही शाळा विद्यार्थ्याना फी भरन्याची सक्ती करत आहेत . तेव्हा येथिल समाज सेवक प्रशांत चंदनशिव यानी या शाळांवर कारवाई करन्याची मांगणी शिक्षण विभागा कडे केली होती . त्यामुळे या तक्रारीची दखल प्रशासनाधिकारी यानी घेतली असुन त्यानी महापालिका हद्दीतील सर्व खाजगी अनुदानित विना अनुदानित शाळाना नोटीस पाठवुन विद्यार्थ्या कडुन फी घेतल्यास करन्यात येइल अशा इशारा दिला आहे .
उल्हासनगर शहरात कोरोना च्या प्रादुर्भावाने शाळा बंद झाल्या असुन शासनाच्या निर्देशा नुसार विद्यार्थ्यांचा फक्त ऑन लाईन अभ्यास सुरु आहे . परंतु ज्या ही विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्या विद्यार्थ्याना काही शाळा ऑन लाईन गृप मध्ये जोडत नाहीत त्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित राहत आहेत . अशी माहीती समाजसेवक प्रशांत चंदनशिव याना मिळताच त्यानी फी मांगणाऱ्या शाळांची तक्रार शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी एम मोहिते यांच्या कडे केली . तेव्हा त्यानी तक्रारीची दखल घेत शहरातील सर्व अनुदानित विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक खाजगी शाळाना ताकीद देवुन फी घेतली तर कारवाई करन्यात येणार आहे असा इशारा दिला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम