माझे कुटूंब माझी जबाबदारी,या मोहिमे अंतर्गत उल्हासनगरात १,५६४६७ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या .

उल्हासनगर(रामेश्वर गवई) :  राज्य शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी . ही मोहिम सुरु केली असुन या मोहिमे अंतर्गत शहरात कोविड चा प्रादुर्भाव कमी करन्या करिता घरो घरी जाऊन तपासण्या करन्याचे काम महापालिका करत आहे . तेव्हा आता पर्यंत ४१ हजार १३३ घरांचे सर्वेक्षण करुन एकुण १ लाख ५६ हजार ४६७ नागरिकांच्या तपासण्या केल्याची माहीती महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी पत्रकार परिषदेत दिली आहे . 

उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करन्यात आले होते . त्यात माहीती देताना आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी सांगितले की . माझे कुटूंब माझी जबाबदारी . या मोहिमे करिता एकुण १८८ पथके तयार केली असुन या पथकात ५६४ कर्मचारी यांचा सामावेश करन्यात आला आहे . तर या पथका मध्ये १ आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोक प्रतिनिधी नी दिलेले २ स्वयंसेवक असणार आहेत . दरम्यान १८८ पथका करिता नागरी प्राथमिक  आरोग्य केंद्र निहाय सी एस आर निधी मधुन विविध रंगाचे १४०० टि शर्ट आणि १४०० टोप्या वाटप केल्याची माहीती आयुक्तानी दिली आहे . दरम्यान या मोहिमे करिता प्रती पथकाला आरोग्य तपासणी करिता किट ही देन्यात आल्या आहेत . तर या मोहिमे अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राना ५० हजार स्टिकर व वार्ड निहाय बॅनर्स वाटप करन्यात आले आहेत . या मोहिमेची माहीती शहरवासीयाना व्हावी म्हणुन शहरात तील २० ते २५ या मुख्य ठिकाणी होर्डिंग लावन्यात आले असुन रिक्षाद्वारे ही मायकिंग करन्यात येत आहे . 

त्याच प्रमाणे नियुक्त केलेल्या पथका मार्फत दररोज ५० घराना भेटी देवुन त्या भेटी दरम्यान ऑक्सिजन लेवल तपासणी करन्यात येत आहे . तर या मोहिमे अंतर्गत आता पर्यंत शहरातील ४१ हजार १३३ घरांचे सर्वेक्षण करन्यात आले असुन १ लाख ५६ हजार ४६७ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करन्यात आल्याची माहीती महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी पत्रकार परिषदेत दिली आहे . या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त सौ जुईकर . वैद्यकिय अधिकारी डॉ . दिलीप पगारे . जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे हे उपस्थित होते .

संबंधित पोस्ट