उल्हासनगर येथिल कोविड१९ रुग्णाकरिता बनवलेले सत्यसाई प्लेटिनम कोविड हॉस्पिटल गेल्या दहा दिवसा पासुन बंद .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिका  क्षेत्रात   कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता या रुग्णांवर उपचार करन्या करिता मोठा गाजा वाजा करुन सत्य साई कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल चे उध्दाटन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करन्यात आले होते  . परंतु हे रुग्णालय सुरवात पासुनच वादात सापडले होते . दरम्यान  आता हेच रुग्णालय गेल्या दहा दिवसा पासुन बंद पडले आहे . 

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने  १६  जुन २०२० रोजी  कोविड १९ या रुग्णा करिता सत्य साई प्लॅटिनम या  रुग्णालयाचे उध्दाटन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  करुन हे हॉस्पिटल गोर गरीबा करिता मोफत असणार असा गाजा वाजा केला होता . परंतु नंतर हे हॉस्पिटल खाजगी असल्याचे महापालिकेने जाहीर केले . या रुग्णालयात ३०० बेड असुन सोबतच ३० व्हेंटिलेटर बेड तयार करन्यात आले . तर डायलेसिस ची सुध्दा सुविधा उपलब्ध करुन  देन्यात आली असुन शस्त्रक्रिया विभाग सुध्दा असल्याचे सांगन्यात आले होते . दरम्यान या कोविड रुग्णालयात   १२  डॉक्टर, ४०  नर्स सहित एकुण  १२० कर्मचारी यांची नियुक्ती करन्यात आल्याचे ही सांगन्यात आले होते . तर या रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या बघता डॉक्टर नर्स व कर्मचारी यांची कोणती ही कमी पडु देणार नसल्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले होते .पण हे रुग्णालय  ३  महीने  व्यवस्थित चालले असुन गेल्या दहा दिवसा पासुन हे रुग्णालय  बंद पडले आहे . मात्र शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असुन या अशा सर्व सोयीनी युक्त रुग्णालयाची गरज शहराला आहे . अशी तक्रार समाजसेवक श्री मुकेश माखीजा यानी केली आहे .

संबंधित पोस्ट