
कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या पॅरामेडिकल कर्मचारी भत्ता व बोनस पासुन वंचित आंदोलनाचा दिला इशारा.
- by Rameshwar Gawai
- Sep 26, 2020
- 838 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : कोविड चा प्रादुर्भाव वाढला तेव्हा पासुन पॅरामेडिकल कर्मचारी हे जीव धोक्यात घालुन काम करत आहेत . या कर्मचाऱ्याना केवळ ८ हजार रुपये वेतन देन्यात येते . कामाचा मोबदला म्हणुन भत्ता व बोनस देन्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते . परंतु अद्याप पर्यंत त्याना भत्ता व बोनस दिले नसल्याने हे कर्मचारी नाराज झाले असुन त्यानी महापालिकेत येवुन अतिरिक्त आयुक्त जुईकर याना भेटुन आपल्या मांगण्याचे निवेदन त्याना सादर केले आहे या चार ते पाच दिवसात आमच्या मांगण्या मंजुर झाल्या नाही तर काम बंद आंदोलन करन्याचा इशारा या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यानी दिला आहे .
उल्हासनगर शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चालला असुन या कोरोना च्या संकट काळात मध्यवर्ती रुग्णालय आणि महापालिकेच्या हेल्थ सेंटर मध्ये काम करणाऱ्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यानी अत्यंत अल्प अशा दर महा फक्त ८ हजार रुपये वेतनावर कोरोना सेंटर मध्ये काम करुन रुग्णां ना सेवा देन्याचे काम हे कर्मचारी करत आहेत . दरम्यान या कोरोना प्रादुर्भात काम करणाऱ्या या पॅरामेडिकल कर्मचाऱ्याना प्रोत्साहान पर भत्ता व बोनस देन्याचे आश्वासन महापालिकेने या कर्मचाऱ्याना दिले होते . परंतु सहा महिने होत आले या कर्मचाऱ्याना अद्याप पर्यंत महापालिकेने भत्ता किंवा बोनस दिले नाही . महापालिकेने कोरोना काळात काम करन्या करिता ११ कर्मचारी हे जवळपास २५ ते ३० हजार रुपये वेतनावर घेतले आहेत . परंतु हे पॅरामेडिकल कर्मचारी फक्त ८ हजार रुपये ऐवढ्या शा अल्प वेतनावर जीव धोक्यात घालुन काम करत आहेत . तरी पण महापालिकेने त्याना अद्याप पर्यंत भत्ता व बोनस दिले नाही . त्यामुळे हे कर्मचारी नाराज झाले आहे . त्यामुळे या कर्मचाऱ्यानी उल्हासनगर महापालिकेत येवुन अतिरिक्त आयुक्त सौ जुईकर यांची भेट घेवुन त्याना आपल्या मांगण्यांचे निवेदन सादर केले आहे . तर अतिरिक्त आयुक्तानी तुमच्या मांगण्या वर पर्यंत पाठवते असे आश्वासन या कर्मचाऱ्याना दिले आहे . दरम्यान चार ते पाच दिवसात मांगण्या मंजुर केल्या नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा या कर्मचाऱ्यानी दिला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम