उल्हासनगर येथिल डंपिंग ग्राऊंड हटविन्यासाठी उपोषण करणाऱ्या नगरसेवका सह आमदाराला राष्ट्रिय हरित लवादाची नोटीस .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप ५ येथिल डंपिंग ग्राऊंड हटविन्यात यावे या करिता साई पक्षाच्या नगरसेवका सह आमदार कुमार आयलानी यानी एक दिवसीय उपोषण केले होते . परंतु या डंपिंग ग्राऊंड चे प्रकरण हे न्याय प्रविष्ट असल्यामुळे या नगरसेवकानी न्यायालयाचा अवमान केला आहे.  म्हणुन  याना राष्ट्रिय हरित लवादाने नोटीस बजावुन खुलासा करन्याचे आदेश दिले आहेत .  

उल्हासनगर कॅंप ५ येथे डंपिंग ग्राऊंड असुन या डंपिंग मुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . तेव्हा स्थानिक रहिवाशी राजकुमार कुकरेजा यानी डंपिंग हटविन्या बाबत न्यायालयात दाद मांगितली आहे . त्यामुळे हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे . दरम्यान उल्हासनगर महापालिकेच्या विरुध्द घनकचरा व्यवस्थापन २०१६ च्या मानका नुसार उल्लघन करन्यात आले असुन कॅंप ५ येथे कचरा डंपिंग करन्यात येते . तेव्हा हे प्रकरण राष्ट्रिय हरित लवाद पुणे येथे न्याय प्रविष्ट आहे . तेव्हा उल्हासनगर चे डंपिंग हटविन्यात यावे या करिता नगरसेवक शेरी लुंड,टोनी शिरवानी . राजेश वधारिया,अमर लुंड यानी ३ सप्टेंबर रोजी  एक दिवसीय उपोषण केले होते  . स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे डंपिंग हटवणे हे गरजेचे आहे .तेव्हा  या उपोषणाला आमदार कुमार आयलानी यानी समर्थनार्थ पत्र दिले होते.त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे.म्हणुन  याना राष्ट्रिय हरित लवाद पुणे यांच्या मार्फत ॲड असिम सरोदे यानी नोटीस बजावली आहे . त्या नोटीसीत म्हटले आहे की उपोषण करुन न्यायालय आणि प्रशासन यांच्यावर दबाव आणुन  न्यायालयाचा अवमान केला आहे . तेव्हा संबधितानी १६ ऑक्टोंबर २०२० पर्यंत जबाब देण्याचे राष्ट्रिय हरित लवादाने आदेश दिले आहेत .

संबंधित पोस्ट