
उल्हासनगरात खड्ड्याचे साम्राज्य,जागो जागी पाण्याची गळती .
- by Rameshwar Gawai
- Sep 23, 2020
- 1178 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यामुळे पाण्याच्या जल-वाहिन्याना गळती लागली असुन रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे . त्यामुळे नागरिकाना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.सदर खड्डे बुजवन्या करिता महापालिका वर वर मलमपट्टी करत आहे. त्यातच पाऊस अधिक पडत असल्याने भरलेले खड्डे पुन्हा जैसे थे होत आहेत.
उल्हासनगर शहरातील प्रमुख रस्ते म्हणजे फालवर लाईन ते नेहरु चौक,फालवर लाईन ते शांतीनगर,शांती नगर ते रामकिसन करोतिया नगर कॅंप ४ येथिल नेताजी चौक कैलास कॉलनी ,नेताजी चौक ते गांधी रोड . या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहे दरम्यान या रस्त्यावर महापालिकेने ठेकेदारा मार्फत माती टाकुन खड्डे बुजवन्याचा प्रयत्न केला परंतु पावसाने या ठेकेदाराचे पितळ उघडे करुन खड्डे पुन्हा जैसे थे . करुन टाकले आहेत . दरम्यान या खड्ड्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी जलवाहिन्या ना गळती लागली आहे.त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सुभाष नगर खेमानी रोड परिसर येथे तर पाऊस असो किंवा नसो परंतु पावसाळा असल्या गत रस्ता नेहमीच ओला असतो . या गळती मुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी पाणी समस्या निर्माण झाली आहे . तर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यानी सकाळी शहरात फेरफटका मारला तर पाणी गळती कोणत्या ठिकाणी आहे हे दिसुन येइल परंतु हा विभाग हलगर्जी पणा अधिक करत आहे . रस्त्यावर खड्डे व पाणी गळती ही दुहेरी समस्या शहरात निर्माण झाली आहे तर पाऊस सुध्दा थांबायचे नाव घेत नसल्याने रस्त्यावर चे खड्डे बुजवण्यास विलंब होत आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम