
स्थायी समिती सदस्य निवडीची ऑनलाईन महासभा रद्द .
- by Rameshwar Gawai
- Sep 22, 2020
- 541 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व विषय समिती च्या सदस्य निवडीची ऑनलाईन महासभा कोरम पुर्ण नसल्यामुळे पिठासिन अधिकारी भगवान भालेराव यानी रद्द केली आहे . तर पिठासिन अधिकाऱ्यानी कायद्याचे उल्लघन केल्याचा आरोप विरोधी पक्षानी केला आहे . दरम्यान २२ सप्टेंबर ही तारीख शासनानेच निश्चित करुन ऑन लाईन महासभा घेवुन स्थायी समिती सदस्य व विषय समितीच्या सदस्याची निवडणुक घेन्याचे आदेश दिले होते .
उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य आणि आठ विषय समितीच्या सदस्यांची निवडणुक ऑन लाईन महासभा घेवुन करन्याचे ठरले होते . तर या ऑन लाईन महासभेचा वेळ हा १२ वाजताचा निश्चित झालेला होता . दरम्यान आजच्या महासभेचे पिठासिन अधिकारी उपमहापौर भगवान भालेराव हे होते . तेव्हा त्यानी १२ वाजता झुम अप वर ऑन लाईन महासभा सुरु केली . मात्र ही सभा सुरु केल्यावर महासभेचा कोरम पुर्ण झाला नाही .तर फक्त १२ च सदस्य ऑन लाईन असल्याने सभेचा कोरम पुर्ण झाला नाही . मग पिठासिन अधिकारी भगवान भालेराव यानी अखेर अनिश्चित काळा साठी महासभा रद्द केली आहे . दरम्यान आज च्या महासभेत स्थायी समितीच्या सभापतीचे भवितव्य निश्चित होणार होते . स्थायी समिती मध्ये भाजपा कडे सदस्य संख्या जास्त असल्याने भाजपाचाच सभापती होण्याची नाकारता येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षानी पिठासिन अधिकाऱ्यावर जाणुन बुजुन महासभा तहकुब करुन पुढे ढकलल्याचा आरोप केला असुन ही लोकशाहीची हत्या आहे असा भाजपाचा आरोप आहे . तर पिठासिन अधिकारी भगवान भालेराव याना या बाबत विचारले असता ते म्हणाले की ऑनलाईन महासभेचा कोरम पुर्ण नसल्यानेच महासभा रद्द केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम