उपासना संस्था व जिल्हा परिषद सदस्य श्री.काशिनाथजी पष्टे यांच्या वतीने राशन किट व २०० वह्यांचे वाटप

शहापुर (महेश धानके)देशावर तसेच राज्यावर कोरोनोच मोठं संकट येऊन ठेपल आहे.आदिवासी लोकांना मदतीचा हात म्हणून बऱ्याच संस्था या आपल्या सढळ हाताने मदत करताना दिसत  आहेत. शहापुर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील करपटवाडी,मधलीवाडी आणि रिकामवाडी येथे आदिवासी बांधवांना ५३८ राशन किट तसेच आदिवासी वाडीतील शाळकरी विद्यार्थ्यांना २०० वह्यांचे वाटप उपासना संस्था तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री.काशिनाथजी पष्टे यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्री.काशिनाथजी पष्टे  उपासना संस्थेचे सौरभ सर,प्राची मॅडम,सपना जैन,श्री.शरद हरड,श्री.सुरेश हरड,श्री.अनंता मोंडूळा तसेच सामाजिक कार्यकर्ते कु.पंढरीनाथ ढमके,गणेश चौधरी उपस्थित होते

शहापुर तालुक्यातील अतिदुर्गम भागात रोजगाराच्या सोयी या फार कमी प्रमाणात  असून आज आदिवासी वाड्यावरील लोकांना हाताला रोजगार नसल्याने डोक्यावर हात ठेवून आदिवासी लोक बसले आहेत यावर एक उपाय म्हणून उपासना संस्था तसेच श्री.काशिनाथजी पष्टे  यांच्या मार्गदर्शना खाली रोजगार उपलब्ध करण्याचा पहिला प्रयोग करपटवाडी येथे करण्यात येणार आहे.यासाठी इलेक्ट्रिक मोटार बसवून बोअरवेल मारण्यात येणार आहे शेतमळ्यासाठी लागणारा शेतकऱ्यांना बी- बियाणे,खते व बाजारपेठेत शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळवून देणे तसेच बागायती साठी लागणारा सर्व खर्च उपासना संस्था करणार तसेच हे सर्व उपक्रम जिल्हा परिषद सदस्य श्री.काशिनाथजी पष्टे  यांच्या सहकार्याने होणार आहेत 

संबंधित पोस्ट