शहापुर तालुक्यातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना आग्रही
- by Mahesh dhanke
- Aug 29, 2020
- 2383 views
शहापुर(प्रतिनिधी) कोरोना महामारीत शिक्षकांचे अनेक जटील प्रश्न निर्माण झाले असून काष्ट्राईब शिक्षक संघटनेने पंचायत समीती शहापुर चे गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांची भेट घेवून सध्याच्या आणि प्रलंबीत समस्यांवर चर्चा करून संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हा-तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये इतर शिक्षकांप्रमाणे मागासवर्गीय शिक्षकांनाही योग्य त्या प्रमाणात पुरस्कार देवून सन्मानीत करावे.नुकत्याच प्रसिध्द झालेल्या पदवीधर जेष्ठता यादीतील त्रृटी,मुख्याध्यापक यादीतील त्रृटींची दुरूस्ती,सर्व्हिस बुक मधील अपु-या नोंदी, मयत शिक्षकांना लाभ,सेवानिवृत्ती प्रकरणे, शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा शिक्षकांच्या इच्छेनुसार कोणत्याही बँकेत पगार होण्यासाठी आवश्यक असलेले पत्र तालुका प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी यांनी काढावे इ.बाबत चर्चा करण्यात आली.
सदर प्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटना कोकण प्रदेशचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड सर,ठाणे जिल्हाध्यक्ष विजय जाधव सर, राठोड सर,शहापुर तालुकाध्यक्ष मनोज गोंधळी सर,अंबरनाथ तालुका अध्यक्ष आनंद सोनकांबळे तालुका उपाध्यक्ष राजेश रोकडे सर, अनिल वाढविंदे सर,अंबरनाथ कार्यध्यक्ष डॉ मिलिंद सूर्यवंशी ,खजिनदार अजय झाजरे उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम