
उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयात अद्यावत सेवा पुरवा,मुख्यमंत्र्या कडे नगरसेविकेचे साकडे .
- by Rameshwar Gawai
- Sep 20, 2020
- 1412 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाला शासनाने सामान्य जिल्हा रुग्णालय असा दर्जा दिला आहे . परंतु या रुग्णालयात दिलेल्या दर्जा प्रमाणे एक ही सुविधा उपलब्ध नाही या रुग्णालयात कसारा कर्जत मुरबाड पासुन आदिवासी,कष्टकरी गोर-गरीब रुग्ण हे प्रसूती, अपघात किंवा इतर उपचार घेण्यासाठी येतात.
परंतु या रुग्णालयात अनेक आजाराचे डॉक्टर उपलब्ध नाहीत त्यामुळे हे कारण पुढे करून रुग्णास कळवा किंवा मुबंईला पाठवलं जाते . तेव्हा शासनाने या रुग्णालयाला अद्यावत सुविधा द्याव्यात अशी मागणी नगरसेविका सौ सविता तोरणे समाजसेवक शिवाजी रगडे यानी मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात केली आहे .
उल्हासनगर मध्ये मध्यवर्ती रुग्णालय हे २०२ बेड चे रुग्णालय असुन या रुग्णालयाला शासनाने सामान्य जिल्हा रुग्णालय असा दर्जा दिला आहे . परंतु या रुग्णालयातील सी टी स्कॅन मशीन गेल्या एक वर्षा पासुन बंद आहे . तर विविध आजारा वरील तज्ञ डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध नाहीत .
दरम्यान ६ व्हेंटिलेटर उपलब्ध असताना अजूनही ते वापरात नाहीत, सिटीस्कँन व इतर सुविधा ही उपलब्ध नाहीत,डायलेसीस च्या पाच मशिन आहेत परंतु त्यातील ३ मशिन बंद आहेत त्यामुळे किडनी आजाराच्या रुग्णाना त्रास सहन करावा लागत आहे . ब्लडबँक रात्री बंद असते गरोदर रुग्णावर होणाऱ्या शस्त्रक्रिया करन्या करिता स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नसते इतर शस्त्रक्रिया करायच्या असेल तर त्या रुग्णाला कळवा येथिल रुग्णालयात जान्यास सांगितले जाते तर या रुग्णालयात कान नाक घसा . या वर सुध्दा उपचार होत नाहीत .
जिल्हा स्तरीय रुग्णालयात अशी अवस्था का?
टीओके नगरसेविका सविता तोरणे रगडे व युवा समाजसेवक शिवाजी रगडे याना हा प्रश्न पडला आहे त्यानी यापूर्वी ही वारंवार सदर रुग्णालयाचा हलगर्जी पणा निदर्शनास आणून दिला आहे, यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी वारंवार भेट घेऊन लेखी निवेदन देऊन सदर बाब निदर्शनास आणुन दिली आहे पण अद्याप पर्यंत कोणत्या ही सुविधा या रुग्णालयात दिल्या नाहीत . त्यामुळे हे आवश्यक पाऊल उचलने गरजेचे असल्याने
सदर तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री मा श्री राजेश टोपे, पालकमंत्री मा श्री एकनाथ शिंदे व संबंधित विभागाला लेखी स्वरूपात केली आहे.
सदर रुग्णालयात जिल्हा स्तरीय सुविधा उपलब्ध कराव्यात अन्यथा जिल्हास्तरीय दर्जा तरी काढून घ्यावा अशी मागणी नगरसेविका सौ सविता तोरणे व शिवाजी रगडे यानी निवेदनात केली केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम