
उपसरपंच गौतमी कांबळे यांना सरपंच सेवा संघाचा उपसरपंच पुरस्कार जाहीर
- by Reporter
- Sep 19, 2020
- 1569 views
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुडाळ ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्या मागासवर्गीय उपसरपंच सौ.गौतमी संभाजीराव कांबळे यांचा गौरव करण्यात येणार आहे.या वर्षीचा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश आदर्श उपसरपंच पुरस्कार गुडाळ ता.राधानगरी, जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.गौतमी संभाजीराव कांबळे यांना नुकताच जाहीर करण्यात आला.पंचायत राज क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार देणेत येतो. पुरस्कार प्रमाणपत्रात असे म्हंटले आहे की, आपण आपल्या कार्यक्षेत्रात सर्व सामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल आपल्याला सन्मानित करणेचा आमचा मानस आहे. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्कारांने दरवर्षी सन्मानीत करण्यात येते या वर्षीचा राज्यस्तरीय शैक्षणिक, समाजिक, राजकिय, क्रीडा उल्लेखनीय कार्याबद्दलचा पुरस्कार जाहीर करत आहे. आपण केलेल्या गावपातळीवर सामाजिकदृष्ट्या आपण कार्यरत आहात. आपण आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आपणास आदरपूर्वक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आपल्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने आपणास सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या पुरस्कार निवड बद्दल आपले अभिनंदन हार्दिक शुभेच्छा!
सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार २५-१०-२०२० रोजी ११ वाजता शिर्डी येथे आयोजित करणेत आला आहे.बाबासाहेब यादवराव पावसे संस्थापक सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघ महाराष्ट्र आयोजित या पुरस्कार सोहळ्यासाठी ना. बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री),ना.देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते) ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर, मा. विजय कुवळेकर (संपादक, झी,२४ तास वृत्तवाहिनी), मा. यादवराव पावसे (संस्थापक सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य),मा.चंद्रकांत दळवी (मा.आयुक्त,महाराष्ट्र राज्य), मा.सुरेशराव कोते (कार्यकारी संचालक, लिज्जत पापड, पुणे), आणि मा. एकनाथराव ढाकणे (राज्याध्यक्ष, ग्रामसेवक युनियन म.राज्य) हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भास्करराव पेरे (राष्ट्रपती पुरस्कार विजेते, आदर्श सरपंच पाटोदा) मा. बाबासाहेब पावसे (राज्य सरचिटणीस सरपंच सेवा संघ) हे असुनपुरस्काराचे स्वरूप आदर्श सरपंच सन्मानपत्र व चिन्ह, सरपंच फेटा देऊन सरपंचाना गौरविण्यात येत आहे.सौ. गौतमी कांबळे यांनी या गुडाळ
ग्रामपंचायतीचा गेली दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून उत्तम कारभार पाहिला असून आता त्या विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार संभाजीराव कांबळे यांच्या त्या सुविद्य पत्नी असून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एक सामाजिक कार्याचा वसा त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जोपासुन अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. त्यांनी गावात शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना राबविल्या व गुडाळ गाव आदर्श बनविले. आपल्या उपसरपंच पदाचा वापर महिला बचत गट सबलीकरण, ए.डी. पाटील साहेब सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संतुलन स्वच्छता मोहीम, हुंडाबळी साक्षरता अभियान, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये गुणवंत कर्मचाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून सौ. कांबळे यांनी खरोखरच आदर्शवत अशा पद्धतीचा
कार्याचा ठसा उमटविला आहे. गुडाळ गाव राजकारणाबरोबरच समाजकार्यातसुद्धा आपल्या पतीसमवेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे कार्य करुन आपला नावलौकिक वाढविलेला आहे.समाजकार्याचा त्यांना गाढा व्यासंग आहे. आपल्या गावचे समाज मंदिर, गावाला पाण्याची सोय, वीज पाणी आणि अन्न-
वस्त्र-निवारा अशा पद्धतीच्या मूलभूत गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःला झोकुन देवुन आपल्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ सरपंच, उपसरपंच व सर्व बॉडीच्या सहकार्याने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार आपल्याला केलेला पाहावयास मिळतो. अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेने गौतमी कांबळे यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणुन हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. "एक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीची मोलाची साथ असते" परंतु येथे सौ. कांबळे यांचे पती आपल्या कामातुन वेळ काढुन त्यांना त्यांच्या समाजकार्यात मोलाची साथ देत आहेत, हे विशेष आहे.तसेच कांबळे कुटुंबिय हे ए.डी. पाटील साहेब यांचे खंदे समर्थक असून गेली पंधरा वर्षे राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याचा ठसा व सामाजिक कार्याबद्दल विविध स्तरातून विविध भागातून व विविध संस्थेकडून सौ गौतमी संभाजी कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे गुडाळ ग्रा.पं.ला अनेक सरपंच , उपसरपंच लाभले परंतु गौतमी कांबळे यांना आदर्श उपसरपंच पुरस्कार गावांमध्ये पहिल्यांदाच मिळत आहे. त्यामुळे विविध स्तरातून त्यांचे कौतुक व चर्चा होत आहे.
रिपोर्टर