सिनेरामा तर्फे ऑनलाइन एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेचं आयोजन.

सध्या कोरोना च्या पार्श्ववभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊनच्या काळात कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देण्याची एक सुवर्णसंधी  सिनेरामा प्रॉडक्शन इवेंट अँड मिडिया घेऊन आली आहे.


प्रती वर्षा प्रमाणे यावर्षी देखील सिनेरामा प्रॉडक्शनने  संजू एन्टरटेन्मेन्ट  प्रायोजित

ऑनलाइन एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धा खुल्या गटा साठी असून, दहा वर्षा पासून पुढील वयोगटा साठी आहे. एकपात्री कलाकारासाठी विनोदी संहिता निवडून, त्याच बरोबर एकेरी नृत्य स्पर्धे साठी आपल्या आवडीचे कोणतेही गाणे स्वता चे नाव सांगून ४ ते ५ मि. चा

मोबाइल वर व्हिडिओ शूट करुन ८०७०००९८२५ या व्हॉटसअप नंबर वर दि.१५ ऑक्टोबर पर्यंत पाठवणे. या स्पर्धकांना फक्त १००/- रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून, या फी च्या माध्यमातून त्या स्पर्धकांना एक वर्षा करीता स्वताचे ओळखपत्र दिले जाईल. त्याच बरोबर बक्षिस पात्र कलाकारांना यूट्यूब चैनल च्या आणि वृतपत्रा च्या माध्यमातून प्रसिध्दी देण्यात येईल. तसेच या स्पर्धेचा निकाल दि.२५ ऑक्टोबर दसरया दिवशी चित्रपट सृष्टीतील मान्यवरां कडून जाहीर केला जाईल.  
असे आयोजक अभिनेता- दिग्दर्शक राम माळी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

संबंधित पोस्ट