उल्हासनगरातील कंटेन्मेंट झोन मधील भाजी मार्केट महापालिकेने केले उध्वस्त.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप ४ येथील जिजामाता उद्याना शेजारी असलेले भाजी मार्केट प्रभाग समिती ३ चे सहायक आयुक्त गणेश शिंपी यानी जे सी बी च्या मदतीने  तोडुन उध्वस्त केले आहे हे मार्केट कंटेन्मेंट झोन मध्ये असल्याने त्या मार्केटवर कारवाई केल्याचे शिंपी यानी सांगितले आहे .

उल्हासनगर कॅंप ४ येथील जिजामाता उद्याना जवळ जुने भाजी मार्केट असुन या मार्केट मध्ये दररोज गर्दी असते . अन लॉक सुरु झाले तेव्हा पासुन हे मार्केट सुरु झाले आहे . परंतु या मार्केटमध्ये  फिजिकल डिस्टंसिंग चा फज्जा उडाला असुन ग्राहक हे तोंडाला मास्क सुध्दा लावत नाहीत . त्यातच या विभागात कोरोना चे बरेच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने हा मार्केट विभाग महापालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणुन जाहीर केले आहे . तरी पण हे मार्केट बिनधास्त पणे सुरु होते  दरम्यान काल महापालिकेच्या प्रभाग समिती ३ चे सहायक आयुक्त गणेश शिंपी यानी आपल्या अतिक्रमण पथकाच्या मदतीने या भाजी मार्केट मधील २० सेड जेसीबी च्या सहायाने तोडुन टाकले आहे . तर हे मार्केट कंटेन्मेंट झोन मध्ये असल्याने च या मार्केट वर तोडक कारवाई केल्याची माहीत गणेश शिंपी यानी दिली आहे .

संबंधित पोस्ट