मा. आ. गणपतराव देशमुख यांचे पीए, चालक पोझीटिव्ह. निकट सहवासितानी तपासणी करण्याचे आवाहन

कोळा (प्रतिनिधी) : माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे पीए व चालक हे दोघे कोरोना बाधित आले आहेत. दोघेही  मा. आ. गणपतराव देशमुख यांच्या सोबत असून अनेक नागरिक, कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात येत असतात. अशावेळी या दोघांच्या संपर्कात जे कोणी आले असेल त्यांनी आरोग्याची तपासणी करावी असे आवाहन डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून मा. आ. गणपतराव देशमुख यांना सबंध महाराष्ट्र ओळखतो. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. परदेशात असणारा हा साथीचा रोग आपल्या घरापर्यंत आला आहे. अशा कठीण काळात नागरिकांना अडचणी येऊ नयेत. त्यांची कामे थांबू नयेत. आरोग्य विषयामध्ये कमतरता जाणवू नये यासाठी मा. आ. गणपतराव देशमुख पहिल्या दिवसापासून लक्ष ठेऊन आहेत. आजही त्यांचे नियमित काम तरुणाला लाजवेल या पद्धतीने सुरू आहे.

गेली सहा महिने ते खबरदारी घेऊन काम करत असताना बुधवारी त्यांच्या सोबत असणारे नेहमी प्रमाणे काम करणारे त्यांचे दोन कर्मचारी बाधित आले आहेत. सुदैवाने दोघांची प्रकृती ठीक आहे. मा. आ. गणपतराव देशमुख आपल्या दोन्ही सहकाऱ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत. सध्या दिवसेंदिवस

परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन विना रुग्ण दगावत आहेत. यामुळे नागरिकांनी शक्यतो विना कारण तसेच महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. सध्या जनता कर्फ्यु सुरू आहे. त्याची काटेकोर पने अमंलबजावणी करा. प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, या दोघांच्या अधिक संपर्कातील जे कोणी आले असेल त्यांनी आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट