उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व इतर समित्याची निवडणुक २२ सप्टेंबर रोजी होणार .
- by Rameshwar Gawai
- Sep 17, 2020
- 414 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीचा कार्यकाल ९ सप्टेंबर रोजी शासनाच्या आदेशा नूसार संपुष्टात आला असुन आता पुढील सदस्य निवडीची प्रक्रिया व इतर समितीच्या सदस्यांची निवडणुक २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑन लाईन महासभेत होणार आहे . तर ही निवडणुक जिंकन्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षानी प्रतिष्ठेची केली असुन त्यांचे इतर डावपेच सुरु झाले आहेत. तर महापौर निवडणुकीत भाजपाला धोका देणारे टिम ओमी कलानी गटाला या निवडणुकीत धुळ चारण्याचा मनसुभा भाजपाने आखला आहे .
उल्हासनगर महापालिका स्थायी समिती च्या व इतर समित्यांचा कार्यकाल हा १ एप्रिल रोजीच संपुष्टात आला होता . परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवुन २२ मार्च पासुन राज्यात व उल्हासनगर शहरात लॉकडाऊन सुरु झाला . त्यामुळे शासनाने स्थायी समिती सभापतीचा कार्यकाल हा ९ सप्टेंबर पर्यंत वाढवुन दिला होता .त्यामुळे आता स्थायी समिती च्या सभापतीचा कार्यकाल संपला आहे . तेव्हा शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार स्थायी च्या आठ सदस्यांची व आठ विषय समित्यांच्या सदस्यांची निवडणुक प्रक्रिया २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑन लाईन महासभेत होणार आहे . दरम्यान स्थायी समिती. व. सार्वजनिक बांधकाम समिती . नियोजन व विकास समिती . पाणी पुरवठा समिती . माध्यमिक शिक्षण व पुर्व प्राथमिक शिक्षण समिती . आरोग्य परिक्षण व वैद्यकिय सहाय समिती .
गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती . क्रीडा समाजकल्याण व सांस्कृतिक समिती . महिला व बालकल्याण समिती या सर्व समितीच्या सदस्यांची निवडणुक २२ संप्टेंबर रोजी ऑन लाईन महासभेत होणार आहे . दरम्यान ही निवडणुक जिंकन्या करिता सत्ताधारी व विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत . या
निवडणुकीतुन टिम ओमी कलानी गटाला दे धक्का करन्याचे षडयंत्र भाजपाने आखले आहे . तर स्थायी समिती मध्ये एकुण १६ सदस्य असुन यात भाजपा ९ शिवसेना ५ . राष्टवादी १ व आर पी आय १ अशी सदस्य संख्या आहे . तेव्हा ही निवडणुक कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे ऑन लाईन होत आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम