मुलीच्या फरार खुन्याना अटक करा,मुलीच्या वडीलाची पोलिस आयुक्ताकडे मागणी .
- by Rameshwar Gawai
- Sep 16, 2020
- 548 views
उल्हासनगर (रामेश्वर गवई) : उल्हासनगर शेजारी असलेल्या आणि हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाजी मलंग जवळील वाडी या ठिकाणी राहणाऱ्या वैशाली राजेंद्र पाटील हिचा हुंडा आणि दोन मुली झाल्याच्या रागातुन पती व सासु यानी संगनमत करुन निर्घुण खुन केला आहे . तेव्हा या प्रकरणी हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असुन यातील आरोपी राजेंद्र पाटील (पती) गंगुबाई पाटील ( सासु ) याना पोलिसानी अटक केली आहे . परंतु या खुनातील आठ संशयीत आरोपी फरार असुन त्याना अद्याप पर्यंत हिल लाईन पोलिसानी अटक केली नाही . तेव्हा या फरार आरोपीना अटक करन्यात यावी अशी मांगणी वैशाली पाटील चे वडील वसंत भोईर यानी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर याना निवेदनाद्वारे केली आहे
त्यानी पोलिस आयुक्ताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वैशाली हिचा विवाह हाजी मलंग जवळील वाडी या गाव चे राजेंद्र कृष्णा पाटील यांच्या सोबत १६/१०/२०१० रोजी झाला आहे . परंतु तेव्हा पासुन पती व सासु हे वैशालीला हुंड्या करिता छळत होते . तर त्यातच तिला दोन मुली झाल्या . या रागातुन त्यानी वैशालीला जेवन न देणे चटके देणे अमानुष पणे मारहाण करुन तिचा शारिरीक व मानसिक छळ चालु केला होता . दरम्यान हे नराधम ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर वैशाली पाटील हिला १९/७/२०१९ रोजी राहत्या घरातच सात वर्षाच्या मुली समोर धारदार शस्त्राने छातीवर तोंडावर जबर वार करुन जिवे ठार मारले . ही घटना दुपारी घडलेली असताना या हत्येच्या कटात त्यांचे नातेवाईक यांचा सुध्दा सहभाग होता असा आरोप वैशालीचे वडील वसंत भोईर यानी निवेदनात केला आहे . दरम्यान या आरोपीना वाचविन्याचे काम हिल लाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम के खंदारे हे करत असल्याचा आरोप करुन या हत्येच्या कटात सहभागी असलेले जयंत परशुराम पाटील . सौ जागृती उर्फ रोहिणी म्हसकर रा . वावेघर ता . पनवेल . सौ रुपा ही आरोपी राजेंद्र पाटील यांची बहिण आहे . पांडु पाटील . संदिप पाटील . पप्या पाटील . गणेश डॉक्टर . व प्रकाश पाटील या आठ ही संशयीत आरोपीना अद्याप पर्यंत अटक केली नाही . तर हे आरोपी राजरोस पणे फिरत असुन मला धमकी देन्याचे काम करत आहेत. अस ही निवेदनात म्हटले आहे . तर हे आरोपी वैशालीच्या खुनाच्या कटात सामिल असुन त्याना ताबडतोब अटक करन्यात यावी अशी मांगणी वैशाली पाटील चे वडील वसंत भोईर यानी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर याना निवेदनाद्वारे केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम