माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी शहापुर पंचायत समिती सज्ज

शहापुर(महेश धानके)  कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. शहापूर तालुका पंचायत समिती तर्फे ही मोहिम पहिल्या फेरीत 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 व दुसऱ्या फेरीत 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नेमण्यात आलेल्या पथकामार्फत शहापुर तालुक्यातील  प्रत्येक व्यक्तीची गृहभेटीव्दारे तापमान व SPO2 तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहिम तालुक्यात प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती  तालुक्याचे  ,आमदार दौलत दरोडा ,तसेच सभापती सौ रेश्मा  मेमाणे यांनी दिली.शहापुर पंचायत समिती सभागृह  येथे आयोजित पत्रकार  परिषद  मध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत पाटील,उपसभापती जगन्नाथ पष्टे,गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे उपस्थित होते,आमदार दौलत दरोडा मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून ही मोहीम यशस्वी झाल्यास रुग्ण वाढीला आळा बसू शकेल,सद्या कोरोना वर लस नसल्याने प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे,

 तर गटविकास अधिकारी सुशांत पाटील म्हणाले की ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज झाली असून लोकांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन ही त्यांनी केली आहे,मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की  तिव्र श्वसनाचे आजार आणि फ्लू सदृश्य आजार सर्व्हेक्षण, रूग्ण आढळल्यास कोविड चाचणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. कोमॉर्बीडीटी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन उपचार सुरू नसल्यास मोफत उपचारासाठी संदर्भ सेवा दिली जाणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.  प्रत्येक पथकात आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्वयंसेवक पथकाव्दारे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे 1 डॉक्टर उपचार व संदर्भासाठी असणार आहे. प्रत्येक पथक प्रथम फेरीमध्ये दैनंदिन 50 घरांना भेटी देईल व व्दितीय फेरीमध्ये 75 घरांना भेटी देईल. 

संबंधित पोस्ट