उल्हासनगरात मोटर सायकल चोरी करणारे तीन जण अटक . सहा मोटर सायकली जप्त .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात मोटर  सायकल चोरांचा सुळसुळाट झाला असुन हे अट्टल मोटर सायकल चोर मौज मजा करन्या करिता गाड्या चोरत असल्याचे दिसते . काल मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी तीन मोटर सायकल चोराना अटक केली असुन त्यांच्या कडुन सहा मोटर सायकली जप्त केल्या आहेत . त्या मोटर सायकलींची बाजार भावाप्रमाणे एक लाख ८० हजार रुपये किमंत आहे .

उल्हासनगर कॅंप ३ येथिल अनिल सिनेमा गृहा समोर असलेल्या मिलननगर मध्ये राहणारा धनंजय कैलास कुमावत २० वर्ष हा मोटर सायकलने शिवाजी चौक मार्गे जात होता . तेव्हा   कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक वाय एम गायकर . ए एस आय तडवी . हवालदार चव्हाण . पाटील.  गावित हे

रात्रीची पेट्रोलिंग करत असताना त्याना धनंजय हा चोरीची मोटर सायकल घेवुन जात असल्याचे दिसले . त्यामुळे त्यानी धनंजय चा पाठलाग केला आणि त्याला शांतीनगर स्मशानभुमी चौकात अडवुन त्याची चौकशी केली असता ती मोटर सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.  तर त्यांच्या कडुन इतर दोन मोटर सायकली  हस्तगत केल्या आहेत . दरम्यान दुसरी कडे सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर कोकरे पो . ह . सुर्वे . पो . ना . जाधव . पो . ना . कुंभार . कामडी . शिंदे . सोनवणे यानी सचिन बाबु पवार . कन्हैय्या राध्येशाम चौरसिया याना ताब्यात घेवुन त्यांच्या कडुन तीन मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत . पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे . सहायक पोलिस आयुक्त टेळे यांच्या मार्गदर्शना  खाली मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर . पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते (गुन्हे) यांच्या आदेशाने पोलिस उप निरीक्षक वाय एम गायकर व त्यांच्या सहकाऱ्यानी चांगली कामगिरी केल्या बद्दल त्यांचे कौतुक करन्यात आले आहे . या तीन ही चोरा कडुन सहा   मोटर सायकली हस्तगत केल्या असुन या मोटर सायकलींची किमंत एक लाख ८० हजार रुपये आहे .

संबंधित पोस्ट