उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आठवड्यातून दोन वेळा फक्त तोंड दाखवायला येतात विरार आरटीओ कार्यालय बेफिकीर दशरथामुळे रामभरोसे

विरार (प्रतिनिधी) : कोणत्याही सरकारी कार्यालयात जबाबदार अधिकारी वेळेवर आणि नियमित हजर असेल तरच तिथे येणाऱ्या लोकांचे काम वेळेवर होते आणि त्यांना न्याय मिळतो पण काही सरकारी कार्यालयातील अधिकारी हे फक्त नावाला तिथे येतात आणि तोंड दाखवून जातात त्याच बरोबर सरकारी कागदपत्रे सुद्धा आपल्या सोबत घेऊन जातात. ती हरवली किंवा त्यांचं आणखी काय झालं तर त्याच्याशी या अधिकाऱ्यांना काहीच घेणे देणे नसते पण ज्या गोरगरीब माणसाच्या कामाशी संबंधित ही कागदपत्रे असतात त्यांचे मात्र नुकसान होते. सध्या विरार आरटीओ कार्यालयात वाशी वरून आलेले उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी तर विरार कार्यालयाला जणू काही मारुतीचे मंदिरच बनवले आहे केंव्हा तरी सवड मिळेल तेंव्हा जायचे आणि दोन घटका थांबून दर्शन घेऊन निघायचे असा प्रकार सुरू आहे. साहेबांच्या या विचित्र वागण्यामुळे लायसन आणि इतर कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहन प्रशिक्षक संस्थां आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

आपण मागील वृत्तात पाहिले की, विरार आरटीओ हे भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच्या विळख्यात आहे, कारण विरार उप.प्रा.प.कार्यालयाला परिवहन खात्यातील कोणत्याही वरिष्ठांचा वचक नसल्याने विरार उप.प्रा.प.कार्यालय हे सर्व गैरप्रकार व गैरकामकाजाचे दुकान(धाबा) बनले आहे, ह्याचे एक उदाहरण म्हणजे वाशी परिवहन कार्यालयात कार्यरत असलेले श्री.दशरथ वाघुले हे नुकताच अतिरिक्त कार्यभार घेऊन विरार येथे उप.प्रा.प.अधिकारी म्हणून रूजू झाले.परंतु रूजू झाल्यापासून आठवडयात मोजून २ दिवसच त्यांची हजेरी असते व ही हजेरी देखील फक्त अवघ्या २-३ तासांसाठीच असते,तर असे का? कदाचित वाशी कार्यालयात कामाचा बोजवारा तर जास्त नाही ना,की त्यांना या विरार कार्यालयात

येण्यासाठी वेळ मिळत नसावा.जर असे असेल तर मग त्यांनी विरार कार्यालयाचा कार्यभार व पदभार का स्वीकारला असावा? असो, आता मोठा प्रश्न असा पडतो की, हे अधिकारी कार्यालयात अनिश्चित वेळेत येतात,व कार्यालयात कोणतेही काम न करता सर्व कामाची सरकारी कागदपत्रे (दस्तावेज) आपणहून नेमलेल्या खाजगी इसम (सरकारी भाषेतील प्रख्यात शब्द ADC) मार्फत त्याच्या खाजगी वाहनातून सही व शिक्कामोर्तब करण्यासाठी आपल्या घरी नेतात,तर असा कोणता शासकीय परिपत्रक वा अभिलेख आहे का,कार्यालयात कोणतेही काम न करता सर्व सरकारी कागदपत्रे ही कार्यालयांच्या बाहेर खाजगी इसमाच्या माध्यमातून घरी हाताळू शकतात, व जर त्यापैकी काही पेपर जर गायब झाले वा हरवले तर मग ही जवाबदारी कोणाची असते? तशीपण कार्यालयातील त्यांची हजेरी ही अनिश्चित स्वरूपाची असते, त्यांच्या येण्या-जाण्याचा ठिकाणा नसतो व अश्या परिस्थितीत आधीच कोविड-१९ च्या

प्रादुर्भावाने त्रस्त असलेली,जानेवारी पासून ते लॉकडाऊन सुरु होईपर्यंत ची आपली सर्व कामे (लायसन्स संबंधीतची) वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्रस्त व हैराण असलेल्या जनतेला, नागरिकांना व ड्रायव्हिंग स्कुल संचालकांना त्यांची कागदपत्रे (८-१० दिवस) वेळेत मिळत नाही.व त्यामध्ये असलेल्या नवीन वाहन नोंदणी च्या पेपरांसाठी च्या व्यक्तींना शोरूम ला एक दिवस पेपर उशिरा झाले म्हणून आर्थिक भुदंड भरावा लागतो.केंद्र सरकारने दिलेल्या वाढीव मुदतीत म्हणजे ३१ डिसेंबर पर्यंत सर्व थकीत कामे पूर्ण करण्यासाठी सांगितलेली आहे, परंतु आजवरपर्यंत विरार कार्यालयातील मागील उप.प्रा.प.अधिकारी श्री.अनिल पाटील हे देखील कार्यालयात बरेच दिवस गैरहजर असत,व त्यांचा देखील येण्याचा व

जाण्याची वेळ ही निश्चित नव्हती, त्यामुळे बऱ्याच लोकांची ही लॉक डाऊन पूर्वीची म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीतील कामे ही अपूर्ण आहे.व लॉक डाऊन लागल्यानंतर विरार कार्यालय चालू होईपर्यंत म्हणजे १६ जून नंतर तर जणू विरार कार्यालय हे बेवारस स्वरूपाचे होते व आता नुकताच ऑगस्ट च्या अखेरीस आलेले हे नवीन अधिकारी देखील तसेच करत आहे, जे पूर्वी चे अधिकारी करत होते.तर आता सर्व जनतेच्या वतीने प्रश्न पडतो की, आता तरी ही अपूर्ण स्वरूपाची कामे पूर्ण होतील कसे? व कधी? कारण संपूर्ण कार्यालयाचा पदभार हा श्री.वाघुले यांनी आपल्याकडे ठेवला.तर दुसरीकडे विरार कार्यालयात नवीन पदभार स्वीकारणारे सहाय्यक उप.प्रा

प.अधिकारी श्री.बागडे ह्यांची कार्यालयातील हजेरी ही नित्यनेमाने असते,ते दररोज कार्यालयात हजर राहून सर्वांच्या समस्या ऐकून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात,परंतु दुःखाची बाब ही की,उप.प्रा.प.अधिकारी ह्यांनी त्यांना एखाद्याच कामाचा कार्यभार देऊन बाकी सर्व महत्त्वाचे व मोठे कार्यभार स्वतःकडे ठेवले आहे, तर असे का? जर त्यांची कार्यालयात नित्यनेमाने हजेरी नसते तर त्यांनी जनतेची कामे सुरळीतपणे व योग्य वेळेत होण्यासाठी सर्व कार्यभार आपल्या गैरहजेरीत कार्यालय

सांभाळणारे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.बागडे ह्यांना आपला काही कार्यभार सोपवावा, जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही.अशी आमची सर्व जनतेच्या वतीने मागणी आहे.व परिवहन खात्यातील वरिष्ठांना विनंती आहे की, आपण विरार कार्यालयात वारंवार घडणाऱ्या ह्या सर्व गैरबाबींची गांभिर्याने दखल घेऊन कार्यालयीन वेळेत दररोज वेळेत हजर राहणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी,जेणेकरून

जनतेची अडकलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील व सरकारी कार्यालयात हजेरी कमी लावलेल्या व हजेरी लावून देखील कार्यालयाला जणूकाही उद्यान समजून नुसता फेरफटका मारणाऱ्या अश्या अधिकाऱ्याची महाराष्ट्र नागरीसेवा सन १९८९ च्या कायद्या अंतर्गत आपल्या कामात दिरंगाई व कामचुकारपणा केल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी,व शासकीय कागदपत्रे आपल्या खाजगी

इसमाच्या (ADC) हाती हाताळण्यासाठी दिल्याबद्दल कडक व ठोस कारवाई करण्यात यावी.व जनतेच्या माहितीसाठी प्रत्येक अधिकाऱ्यांची कार्यालयीन कामकाजाची वेळापत्रक बाहेर सूचना फलकावर लावण्यात यावे व मागील वृत्तपत्रांमध्ये सौ.भारती पाटील मॅडमनी मांडलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी ह्यांची कार्यालयात येण्या-जाण्याची हजेरी बुक, तक्रार बुक, व्हीजिटर बुक,सि.सि.टिव्ही कॅमेरे व प्रियदर्शनी फलक लावण्यात यावे.कारण अजूनही या काही मागण्याची पूर्तता झाल्याचे चित्र दिसून येत नाही.

संबंधित पोस्ट