विज बिले भरमसाट आल्याने नागरिकामध्ये असंतोषाचे वातावरण .
- by Rameshwar Gawai
- Sep 14, 2020
- 1815 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : लॉक डाऊन मुळे गोर गरींबाचे कंबरडे मोडले आहे . नोकऱ्या गेल्या आहेत पैसा कुठुन येत नाहीत त्यातच महावितरण ने या गोर गरीब नांगरिकाना भरमसाट विज बिले पाठवली आहेत . त्यामुळे ही विज बिले बघुन सर्व नागरिकामध्ये असंतोषाचे वातावण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने मार्च मध्ये लॉक डाऊन सुरु झाले तेव्हा पासुन येथिल सर्व सामान्य नागरिक घरातच बसला आहे . तर काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत .त्यामुळे पैसा कुठुन येणार या चिंतेत असतानाच महावितरणे ने या गोर गरीब नागरिकाना विजे चे बिले पाठवुन त्याना डोळेच पांढरे करन्याची वेळ त्यांच्यावर आली आहे . तर जुन जुलै या महिन्या मध्ये जे ही नागरिक गावी गेले आहेत त्याना सुध्दा सरसकट विज बिले पाठवली आहेत . ऐवढे विज बिल भरणार कसे असा यक्ष प्रश्न या नागरिकांसमोर उभा ठाकला आहे . कोरोना प्रादुर्भावाने सर्वच बंद असल्याने रोजगार मिळत नाही तेव्हा पैसा कोठुन आणायचा या विचारात येथिल नागरिक दिवस काढत आहेत . दरम्यान या शासनाने विज बिलात मोठ्या प्रमाणात सुट द्यावी अशी मांगणी मनसे चे शहर अध्यक्ष बंडु देशमुख यानी महावितरण कडे केली आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम