उल्हासनगर महापालिकेचा ८२१ कोटीचा व ९ लाख शिल्लकीचा अर्थ संकल्प सादर .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी महापौर लिलाबाई आशान याना २०२० ते २०२१ चा अर्थ संकल्प सादर केला आहे . या अर्थ संकल्पात ८२१, २६ कोटी उत्पन्न  ८२१ ,१७ कोटी खर्च आणि ९ लाख रुपये शिल्लक दाखवुन हा अर्थ संकल्प फुगवुन सादर केला आहे . मात्र या अर्थ संकल्पात कोणती ही करवाढ नसली तरी शहरवासीयाना अनेक गाजरे दाखवुन नागरिकाना कोविड काळात घरपट्टी माफी पासुन वंचित ठेवले आहे . 


उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यानी २०२० ते २०२१ या वर्षीचा ४८३ कोटीचा अर्थ संकल्प तयार केला होता परंतु त्या अर्थ संकल्पाला  कोविड च्या प्रादुर्भावामुळे मंजुरी मिळाली नव्हती .दरम्यान हाच अर्थ संकल्प आयुक्ताच्या अंदाजा नुसार ४८३,४१ कोटी उत्पन्न ४८३,२५ खर्च आणि १६ लाख शिल्लक असा असुन स्थायी समितीने या अर्थ संकल्पात हवा भरुन ७७०,७६ कोटी उत्पन्न ७७० ,६७ खर्च आणि ९ लाख रुपये शिल्लक असा सादर केला . परंतु त्या ही अर्थ संकल्पात महासभेने सुध्दा उरलेली हवा भरुन हाच अर्थ संकल्प ८२१,२६ कोटी उत्पन्न  दाखवुन ८२१,१७ कोटी खर्च आणि ९ लाख रुपये शिल्लक असा सादर केला आहे . या अर्थ संकल्पात महापौर निधी ३ कोटी . उपमहापौर निधी २ कोटी ५० लाख . अशी तरदुद केली असुन स्थायी समिती सभापती . सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता याना प्रत्येकी २ कोटीच्या निधीची तरतुद केली आहे . दरम्यान नगरसेवक निधीत कपात करुन ३०:लाखावुन २० लाख रुपयाचा निधी त्याना मिळणार आहे . शहर विकासाच्या दृष्टीने खेमानी नाला ५ कोटी रुपये . स्टेशन परिसराचा विकास करन्यासाठी १ कोटी रुपये . अमृत योजने अंतर्गत भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा योजना प्रत्येकी ३२ कोटीचा निधी मंजुर केला आहे . दरम्यान व्हिटीसी स्टेडियम साठी १३ कोटी रुपये . नवीन क्रॉंक्रिट चे रस्ते बनवन्यासाठी १० कोटी रुपये . दुर्बल घटक विकास कार्य या करिता ५४ कोटी रुपये . सिंधु भवन . पत्रकार भवन . संत रोहीदास समाज भवन व महर्षी वाल्मिक भवन या साठी प्रत्येकी १ कोटी रुपये . उद्यान बनवन्यासाठी ५ कोटी रुपये . प्रत्येक नगरसेवकांच्या वार्डात एल ई डी बसवन्या करिता २ कोटी ५० लाख रुपये . वडोल गांवचा प्रस्तावित केलेला रोड  ४ कोटी रुपये . अशा प्रकारे अनेक विविध योजना लागु करन्या करिता या अर्थ संकल्पात तरतुद केली आहे . मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त झाले असुन त्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे . तेव्हा त्याना घरपट्टी माफ करन्याची कोणती तरतुद या अर्थ संकल्पात केली नाही . हा अर्थ संकल्प सादर करताना महापौर लिलाबाई आशान . उपमहापौर भगवान भालेराव . नगरसेवक धनंजय बोडारे . नगरसेवक अरुण आशान . जन संपर्क अधिकारी युवराज भदाणे हे उपस्थित होते .  

संबंधित पोस्ट