खाजगी करणाच्या निषेर्धात उल्हासनगर काँग्रेस चे आंदोलन .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : केंद्रतील  भाजप  सरकारने  प्रत्येक  सरकारी विभागात खाजगी करण करणे सुरु केले  आहे. त्यामुळे  सरकारी नोकऱ्या  समाप्त  होत आहेत . हे एक  भाजपाचे सरकारचे  षडयंत्र आहे. हा देश उद्योगपतींच्या हातात देवून पुन्हा या देशात गुलामी लादण्याचा मनसुभा या सरकारने  आखला आहे . मात्र  

हा मनसुभा काँग्रेस पक्ष उधळून लावेल असा इशारा  देत उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष राधाचरन करोतीया यांच्या  नेतृत्वाखाली  नेहरु चौक उल्हासनगर २. येथे आंदोलन  करण्यात आले आहे . या आंदोलनात माजी  महापौर मालती करोतीया. जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार आघाडी अध्यक्ष  महादेव शेलार. उपाध्यक्ष वजिउद्दीनखान  महिला अध्यक्ष सुजाता शास्त्री. विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहित आव्हाड. महासचिव तथा अनूसुचित जाती विभाग अध्यक्ष दिपक सोनोने . महिला कार्याध्यक्ष विजया शिंदे. ओ बी सी  सेलचे  अध्यक्ष  सुरेश काजळे. ख्रिश्चन  सेलचे अध्यक्ष मनोज मिसाळ.  रोजगार  सेलचे अध्यक्ष गणेश मोरे. महासचिव दिपक टी सोनवणे. भागवत तायडे. सेवादल उपाध्यक्ष अनिल यादव. लवेशसिंग. नारायण  गेमनानी. राहुल करोतीया  मोहम्मद शेख इत्यादी कॉंग्रेस चे  पदाधिकारी या आंदोलनात  सहभागी  होऊन  प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे  याना  निवेदन देण्यात आले आहे .

संबंधित पोस्ट