उल्हासनगर महापालिकेच्या अर्थ संकल्पात कोविड च्या पार्श्वभुमीवर आरोग्य सेवेची तरतुद करन्याची मांगणी .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेचा  अर्थसंकल्प सादर झाला असुन  या अर्थ संकल्पात  कोवीड १९ च्या पार्श्वभुमीवर  आरोग्यसेवेसाठी विशेष तरतूद करण्याची मागणी काॅग्रेस गटनेता सौ अंजलीताई  साळवे यांनी केली आहे .
       
उल्हासनगर महापालिकेने २०२० ते २०२१ या वर्षाचा अर्थ संकल्प सादर केला आहे . तेव्हा या अर्थ संकल्पात आरोग्य विषयक तरतुदी करणे गरजेचे आहे तर  उल्हासनगर मध्ये असलेल्या  सातही आरोग्य केंद्रावर कोविड १९ च्या पार्श्वभुमीवर  डॉक्टर आणि इतर कर्मचारी  उपलब्ध करून द्यावेत. दरम्यान

प्रत्येक प्रभागात एक आरोग्य केंद्र याप्रमाणे २० प्रभागात २० आरोग्य केंद्रे सुरू करण्यात यावे त्याच प्रमाणे  महानगरपालिकेने  स्वत:चे रुग्णालय  बांधावे

तसेच कोवीड १९ मध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून घरोघरी सर्वेसाठी जाणाऱ्या 'आशा सेविकांचे  चे ४० दिवसाचे ३०० रू.प्रतिदिन या प्रमाणे मानधन  तातडीने अर्थ संकल्पात  मध्ये तरतूद करुन त्याना मानधन देन्यात यावे  . या अशा मांगण्या कॉंग्रेस च्या गटनेत्या अंजलीताई साळवे यानी आयुक्त डॉ.  राजा  दयानिधी यांच्या कडे केल्या आहेत .

उल्हासनगर सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मुलांसाठी खेळांची मैदाने उपलब्ध नसल्यामुळे नवीन पिढी मोबाईल व टि व्हि  मध्ये रमून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे,


म्हणून जे काही राखीव भूखंड उरले आहेत त्यांना ताब्यात घेऊन शक्य तितकीे खेळांची मैदाने विकसित करावी जेणेकरून पुढची पिढी सुदृढ व निरोगी बनेल, यासाठी बजेट मध्ये विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी ही त्यानी केली आहे  .
           
तसेच प्रभाग १८ मधील राजीव गांधी उद्यान येथे बॅडमिंटन कोर्ट व छत्रपती शिवाजी महाराज  उद्यान येथे लहान मुलांचे खेळांचे मैदान,

तक्षशिला विद्यालया जवळ असलेल्या  पाण्याच्या टाकीखाली नाना नानी पार्क विकसित करण्यात यावे  यासोबतच प्रभागातील रस्ते व तातडीच्या काही कामांची यादी ही या अर्थ संकल्पात सामाविष्ट करन्यात यावी अशी मांगणी अंजलीताई साळवे यानी केली आहे . 

संबंधित पोस्ट