
*हितेश थोरात यांची युवक काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती*
- by Mahesh dhanke
- Sep 09, 2020
- 1207 views
मुरबाड (महेश धानके)मुरबाड विधानसभा मतदार संघातील युवक काँग्रेसचे धडाडीचे युवा नेते हितेश हरीचंद्र थोरात यांची नुकताच ठाणे ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे,युवक चे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी थोरात यांचे संघटन कौशल्य व कोरोना कालावधी मध्ये केलेले काम पाहून त्यांची नियुक्ती केली आहे,मागील वर्षी झालेल्या प्रदेश युवक काँग्रेस निवडणुकीत ते चांगली मते घेऊन प्रदेश कार्यकारिणीत निवडून आले होते,बदलापूर मध्ये युवा वर्गाशी त्यांचे चांगले संबंध असून त्यांनी लोकसभा निवडणूक मध्ये चांगले काम केले आहे,त्यांचे वडील हरीचंद्र थोरात यांनीही बदलापूर शहर ब्लॉक अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे,हितेश थोरात यांनी लॉक डाऊन च्या काळात गरजू व गरीब लोकांना भाजीपाला अन्नधान्य किट वाटून चांगले कार्य केले होते त्यांच्या या कार्याची व संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांना सत्यजित तांबे यांनी जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून त्यांच्या निवडीचे ठाणे जिल्ह्यातील युवकांनी स्वागत केले आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम