प्रांत अधिकाऱ्याच्या लेटर पॅडवर तहसिलदाराची सही आदिवासीच्या जमीनी हडपणाऱ्या वर कारवाई नाही. तहसिलदार कार्यालयातील मोठा घोळ .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरा लगत असलेल्या वरप कांबा येथिल आदिवासीच्या जमिनी हडप करणाऱ्या उल्हासनगर येथिल भुमाफिया याना तहसिलदार कार्यालया मार्फत संरक्षण मिळत असुन या तहसिदाराने या भुमाफियाना मदत करताना चक्क प्रांत अधिकारी यांच्या लेटर पॅड चा वापर करुन त्या लेटर पॅड वरुन जवळ पास ४० ते ५० पत्रे पाठवुन त्यावर स्वता तहसिलदार दिपक आकडे यानी सह्या केल्याचे उघड झाले असुन या वरुन या तहसिलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी केला आहे .

उल्हासनगर जवळ असलेल्या वरप कांबा येथिल आदिवासीच्या करोडो रुपये किमंतीच्या शेकडो एकर  जमीनी उल्हासनगर येथिल भुमाफिया यानी हडप केल्या आहेत . त्या जमीनीवर या भुमाफिया यानी अनधिकृत बांधकामे सुरु केले असल्याने या बांधकामा बाबत व जमीनी हडप केल्या बाबत परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी दिल्ली येथिल राष्ट्रिय जनजाती आयोगा कडे तक्रार केली तेव्हा या आयोगाने सदर बांधकामावर कारवाई करन्याचे आदेश कल्याण तहसिलदार दिपक आकडे याना एक वर्षा पुर्वीच दिले होते परंतु आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करत या बांधकामावर कारवाई तर सोडाच पण ते बांधकामे बंद सुध्दा करु शकले नाहीत . उलट तक्रार दार याना तक्रारीचे उत्तर देताना आकडे यानी पत्रात बऱ्याच चुका केल्या आहेत त्यानी उत्तर देताना पत्रात म्हटले आहे की आपला दि . २/१२/२०२० रोजीचे पत्र.  परंतु १२ वा महिना येण्यास अजुन चार महिने बाकी आहेत .  तर दुसरी चुक अशी असुन मौजे कांबा येथिल फे . क्र . ३३१२ हा फेरफार दिनांक १८/१०८/२००६ रोजी नोंदवुन महाराष्ट्र जमिन अधिनियम १९६६ मधिल तरतुदीनुसार कारवाई करन्यात आली असे म्हटले असुन वास्तविक हा अधिनियम अस्तित्वात नसुन महाराष्ट्र जमिन महसुल सहिंता १९६६ हा अधिनियम अस्तित्वात आहे दरम्यान विशालकुमार गुप्ता यानी तहसिदार यांची कान उघडनी करताना तक्रारीत  म्हटले आहे  की भारतासहित सर्व जगातील कॅलेंडर मध्ये फक्त १२ च महिने असुन मग १८ /१०८/२००६ या महिन्याची नोंद ते ही प्रांत अधिकाऱ्याच्या लेटर पॅड वर नोंद करुन सह्या करतो . हे किती लाजिरवाणी बाब असुन शासनाचे वाभाडे काढणारी गोष्ट आहे . दरम्यान एक जबाबदार अधिकारी ऐवढ्या मोठ्या  चुका करतो याचा अर्थ हा अधिकारी नशेमध्ये राहुन  भुमाफिया याना मदत करन्याच्या उद्देशानेच प्रांत अधिकाऱ्याच्या लेटर पॅड वर सह्या करतो का . तर आमची दिशाभुल करुन चुकीची माहीती देत असल्याचा  आरोप विशालकुमार गुप्ता यानी केला आहे . तर राष्ट्रिय जनजाती आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करुन भुमाफिया याना मदत करुन त्यांच्या बांधकामावर अद्याप पर्यंत कोणती ही कारवाई केली नाही . या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे तहसिलदार दिपक आकडे हे म्हणतात परंतु चौकशीच्या आधिन राहुन सदर बांधकाम थांबवणे हे तहसिलदाराचे काम आहे परंतु तहसिलदार आणि भुमाफिया यांच्या संगनमतानेच हे सर्व सुरु असल्याचा सवाल गुप्ता यानी उपस्थित केला आहे . त्यामुळे या प्रकरणाची सी बी आय द्वारे चौकशी करुन आदिवासी याना न्याय मिळवुन देन्याची मांगणी गुप्ता यानी केला आहे . 

संबंधित पोस्ट