शॉर्ट फिल्म मेकर,लेखक,कवी सचिन सुशील यांचा उल्हासनगर मध्ये सत्कार .
- by Rameshwar Gawai
- Sep 08, 2020
- 407 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल अन्याय विरोधी संघर्ष समिती आणि सार्वजनिक मित्र मंडळ उल्हासनगर ४,पत्रकार. व ,सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने फिल्मकार सचिन सुशिल यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करन्यात आला होता . तेव्हा हा समारंभ वरिष्ठ पत्रकार,व माजी नगरसेवक श्री दिलीपजी मालवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे .
या सत्कार समारंभाला नगरसेवक श्री प्रमोद टाले ,कडु डोस कारचे लेखक व माजी नगरसेवक शांताराम निकम, शरदभाऊ माने, सुधीर परांजपे समाजसेवक व पत्रकार उपस्थित होते . सचिन सुशिल यानी बनवलेली ' सुर्य चोरलेला माणुस, या लघुपटाची सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन झाल्याने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता . १३ मिनिटांचा असलेला
मराठी लघुपट "सूर्य चोरलेला माणूस"(A Man who stolen sun)चे निर्माता,दिग्दर्शक सचिन सुशील यानी वार्तालाप करताना आपल्या लघुपटा बाबत विचार कथन केले .
तर या सत्कार समारोहाला प्रदीप कपूर ,राजू पंजवणी,हरी चावला,कुमार रेडियार,सलीम मंसुरी सुखनंदन गवई, जॉनी डेव्हिड ,किरण तेलगोटे, सुशील पगारे, दीपक मोरे, पंकज गुरव इत्यादी पत्रकार उपस्थित होते .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम