उल्हासनगर चे भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या लोणावळ्यातील हॉटेल मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा . ७२ जणांवर गुन्हा दाखल
- by Rameshwar Gawai
- Sep 08, 2020
- 451 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर चे भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या लोणावळा येथील कुमार रिसाॅर्ट या नामांकित हाॅटेलात रंगलेल्या जुगारावर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या पथकाने रविवारी रात्री धाड टाकत ७२ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४४ लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
जुगार खेळण्यासाठी आलेले सर्व जण हे गुजरात राज्यातील व्यापारी असून खास जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आले होते.
लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कुमार रिसाॅर्टमध्ये जुगार खेळ सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांना मिळाल्यानंतर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काँवत यांच्यासह लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पल्लवी वाघोले, अश्विनी लोखंडे, विकास कदम, शंकर धनगर, सागर धनवे, ईश्वर काळे, सतिष कुदळे यांच्या पथकाने छापा मारत ही कारवाई केली.
यामध्ये गुजरात येथील ६० व्यापार्यांसह सर्व्हिस प्रोव्हाईड करणार्या १२ महिला तसेच कुमार रिसाॅर्टचे मालक धिरजलाल कुमार ऐलानी, कुमार रिसाॅर्टचे व्यवस्थापक अन्वर शेख (दोघेही रा. मुंबई), जुगारीचे नियोजन करणारा झिशान इरफान ईलेक्ट्रिकवाला (वय ३४ , रा. जोगेश्वर वेस्ट मुंबई) यांच्यावर पोलीस काँन्स्टेबल विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी कलम १८८ , २६९ यासह दारुबंदी कायदा कलम ८६ (१), जुगार प्रतिबंध अधिनियम ४ व ५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या धाडीत पोलीसांनी खेळात वापरलेली ३ लाख २० हजार ८३० रुपयांची रोकड, ६ हजार ३४३ रुपयांची दारू, खेळासाठी वापरण्यात येणारे १००० रुपये किंमतीचे ३६ लाख ६० हजार रुपयांचे टोकन व ५०० रुपये किंमतीचे ४ लाख ७५ हजार रुपयांचे टोकन जप्त केले आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम