उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयातील तीन डायलेसिस मशीन खराब . रुग्णांचे हाल .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिवसे दिवस चव्हाट्यावर येत आहे . या रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असुन वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावन्याची ही संख्या वाढत चालली आहे . तर किडनीच्या रुग्णासाठी या रुग्णालयात पाच डायलेसिस मशीन असुन यातील तीन मशीन खराब झाल्याने किडनीच्या रुग्णांचे हाल होत आहेत . तर या रुग्णालया कडे वरिष्ठांचे लक्ष नसल्याने हे  रुग्णालय सध्या व्हेंटीलेटरवर  आहे . 

उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालय हे २०२ चे बेड चे रुग्णालय आहे . या रुग्णालयात कर्जत ते कसारा तसेच ग्रामिण भागातुन रुग्ण येतात . परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव येथिल डॉक्टर व नर्सेस च्या पथ्यावर पडला आहे . कोणता ही रुग्ण उपचारा करिता गेला तर  त्याला तपासायला येथिल डॉक्टर नखरे करतात . रुग्णा सोबत असलेल्या नातेवाईकानाच रुग्णाच्या बोटाला ऑक्सिमिटर लावायला सांगतात . तर बी पी वगैरे न तपासताच त्याला पुढे घेवुन जा अशा सुचना रुग्णांच्या नातेवाईकाना करतात . दरम्यान या रुग्णालयात गोर गरीब किडनीच्या रुग्णाना डायलेसिस करन्या करिता रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एक वार्ड असुन त्या वार्डात डायलेसिस च्या पाच मशीन आहेत . तर एका वेळी पाच रुग्णाना डायलेसिस करन्यात येते . परंतु सध्या पाच मशीन पैकी तीन मशीन खराब झाल्या आहेत . त्यामुळे डायलेसिस करन्या पासुन किडनीच्या रुग्णाना वंचित राहावे लागत आहे . तर वेळेवर किडनी डायलेसिस केली नाही तर त्या रुग्णाना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . दरम्यान सध्या कोविड मुळे या रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेस रुग्णांची जाणुन बुजुन हेळसांड करतात . तर रुग्णाला हात देखिल लावन्यात पुढे धजावत नाहीत . या रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुधाकर शिंदे हे मध्यंतरी कोविड पॉझिटिव्ह आल्याने ते सध्या तरी रजे वर आहेत . त्यामुळे या रुग्णालया कडे लक्ष देणारे कोणी नसल्याने हे रुग्णालयच  व्हेंटिलेटर वर असल्याचे दिसुन येत आहे . दरम्यान या रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली असुन साफ सफाई निट होत नसल्याचे दिसुन येत आहे . त्याच प्रमाणे रुग्णालयाच्या आवारातील रस्ता एकदम  खस्ता झाला असुन जागोजागी खड्डे पडले आहेत . या खड्ड्या बाबत रुग्णालय प्रशासनाला विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी विचारणा केली आहे . परंतु रुग्णालय प्रशासनाचे एकच उत्तर आहे ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे बस्स ऐवढेच . अद्याप पर्यंत ना खड्डे बुजले ना रस्ता बनला . ऐवढे रुग्णालय प्रशासन ढिम्म झाले आहे . तर किडनी  डायलेसिस च्या तीन मशीन खराब झाल्याने गोर गरीब रुग्ण जाणार कोठे असा प्रश्न या रुग्णा समोर उभा ठाकला आहे . दरम्यान रुग्णालया कडे वरिष्टानी लक्ष देवुन रुग्णालयाची सुधारणा करावी अशी मांगणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत .

संबंधित पोस्ट