उल्हासनगर येथील टिओके च्या विद्यार्थी सेल च्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला .
- by Reporter
- Sep 05, 2020
- 755 views
उल्हास्नगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथील कॅंप ३ मध्ये असलेल्या अशोक टॉकिज जवळ काही गुंड एका व्यापाऱ्याला मारत असताना ते भांडण सोडवन्यास गेलेले टि ओ के च्या विद्यार्थी सेल चे अध्यक्ष सनी तेलकर यांच्यावर च प्राणघातक हल्ला करन्यात आला आहे . त्या हल्ल्यात तेलकर जखमी झाले असुन त्याना उपचारा करिता खाजगी रुग्णालयत दाखल केले आहे . तर या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला आहे .
उल्हासनगर अंबरनाथ रोड वर असलेल्या अशोक टॉकिज जवळ काल रात्रीच्या सुमारास प्रफुल कुमावत व योगेश पवार हे एका सिंधी व्यापाऱ्याला मारहाण करत होते . तेव्हा त्याच रोड ने टि ओ के च्या विद्यार्थी सेल चे शहर अध्यक्ष सनी तेलकर हे आपल्या गाडीने जात असताना त्यानी मारहाण करणाऱ्या गुंडाना रोखुन का मारता अशी विचारणा केली . मात्र त्यातील प्रफुल कुमावत याने तु कोण आम्हाला विचारणारा असे म्हणत त्याने सनी तेलकर वरच चाकुने हल्ला केला त्या हल्ल्यात तेलकर च्या पोटावर गंभीर दुखापत झाली असुन त्याना एका खाजगी रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे तर तेलकर यांच्या तक्रारीवरुन प्रफुल कुमावत आणि योगेश पवार यांच्यावर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे .

रिपोर्टर