उल्हासनगर येथिल शाळेंची मनमानी. फी न भरणाऱ्या विद्यार्थ्याना शिक्षणापासुन ठेवत आहेत वंचित .
- by Rameshwar Gawai
- Sep 04, 2020
- 733 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : कोरोना च्या प्रादुर्भावाने गोर गरीब पुर्णता बर्बाद झाला असुन त्यांचा रोजगार गेल्याने सर्वच आर्थिक नाकेबंदी झाली आहे . त्यामुळे शाळेची फी कोठुन भरणार असा प्रश्न पालका समोर उभा ठाकला आहे . त्यातच शाळे वाल्यानी फी चा तगादा लावल्याने फी न भरणारे विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित राहणार असल्याने ज्या ही शाळा फी बाबत विद्यार्थ्याना सक्ती करत आहेत त्या शाळांवर कारवाई करन्याची मांगणी समाजसेवक प्रशांत चंदनशिव यानी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी याना निवेदनाद्वारे केली आहे .
उल्हासनगर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने लॉक डाऊन सुरु झाले आहे . त्यामुळे सर्वच रोजगार बंद झाले आहेत तर शाळा देखिल सुरु झाल्या नाहीत . त्यातच शासनाच्या आदेशाने ऑन लाईन शाळा सुरु झाल्या आहेत . मात्र ज्या ही विद्यार्थ्यानी फी भरली आहे त्या विद्यार्थ्याना ऑन लाईन ॲड केले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्या विद्यार्थ्याना ऑन लाईन ॲड न करता त्याना शिक्षणा पासुन वंचित ठेवन्याचे कारस्थान येथील काही शाळा करत आहेत .दरम्यान शासनाने फी न भरन्याचे आदेश दिले आहेत तरी पण काही शाळा प्रशासन शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत विद्यार्थ्याना फी भरन्याची सक्ती करत आहेत . म्हणुन महापालिकेच्या शिक्षण विभागाने फी मांगणाऱ्या अनुदानित अथवा विना अनुदानित शाळांवर कारवाई करन्याची मांगणी समाजसेवक प्रशांत चंदनशिव यानी प्रशासन अधिकाकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम