शहापूर मध्ये आजही कोरोनाचा कहर कायम, ३५ व्यक्ती कोरोना बाधित,१ रुग्णाचा मृत्यू

शहापूर (महेश धानके) शहापूर तालुक्यात अवघ्या पाच दिवसात २६४ रुग्णांची नोंद झाली असून आज ३५ बाधित तर एक रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.

अन लॉक ५ सुरू झाला असून शहापूर मध्ये कोरोना कमी होण्याचे मात्र नाव घेत नाही त्यामुळे  प्रशासनापुढे कोरोनाने चॅलेंज उभे केले आहे,गणेशोत्सव काळात शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठमध्ये होत असलेली गर्दी पाहून रुग्ण संख्या वाढणार असल्याचे बोलले जात होते ते खरे झाले असून अवघ्या पाच  दिवसात शहापूर तालुक्यात २६४ रुग्णांची नोंद झाली आहे तालुक्यातील वाशिंद शहरात तर रोजच रुग्ण वाढत असून तालुक्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून वाशिंद शहराचे नाव पुढे येत आहे,कसारा मध्ये आज एकाच घरात ४ रुग्ण सापडले आहेत,तर धोंडाळपाडा सारख्या 40 घरांची लोकवस्ती असलेल्या छोट्या पाड्यातही कोरोनाने एन्ट्री केली आहे.

तालुका आरोग्यअधिकारी डॉ तरुलता धानके यांनी दैनिक आदर्श महाराष्ट्रला दिलेल्या आजच्याअहवालानुसार  तालुक्यातील एकूण बाधित संख्या १६९८ असून आतापर्यंत १२५५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे,५६ रुग्ण मृत्यू पावले असून ३८७ रुग्ण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत,तर कॉरंटाईन व होम कॉरंटाईन व्यक्तींची संख्या १०६९३आहे,

संबंधित पोस्ट