उल्हासनगर महापालिका कमर्चारी चार वर्षां पासून ७ व्या वेतना पासून वंचित. आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावणार आयुक्तांनी दिले आश्वासन .
- by Rameshwar Gawai
- Sep 03, 2020
- 738 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिका कर्मचारी आणि अधिकारी गेल्या चार वर्षां पासून ७ व्या वेतना पासून वंचित आहेत.गेली दोन वर्ष महापालिकेतील कामगार संघटना यासाठी प्रयत्न करीत आहेत.मात्र महापालिका प्रशासन त्यांना दाद लागू देत नाही.अखेर आमदार बालाजी किणिकर यांनी आयुक्त डॉ . राजा दयानिधी यांची भेट घेऊन चर्चा केली. सदरचा प्रलंबित प्रश्न आठ दिवसांत सोडवतो असे आश्वासन त्यांनी आमदार व कामगार संघटनेच्या पदाधिका-यांना दिला आहे. आयुक्त खरंच दिलेला शब्द पाळतील का याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाने राज्यांतील सर्व कर्मचा-यांना १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू केला आहे.राज्यांतील सर्व महापालिका, पालिका,नगरपरिषदेने आपल्या कर्मचा-यांना हा आयोग लागू करावा असे आदेश दिले आहेत.या आदेशाला चार वर्षं उलटून गेली. मात्र अद्याप उल्हासनगर महापालिकेतील कर्मचारी - अधिकारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. या संदर्भांत महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना , भारतीय कामगार कर्मचारी महासंघ , अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि लेबर फ्रंट या कामगार संघटना आंदोलन आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षां पासून प्रयत्न करीत आहेत.मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती खराब आहे. असे उत्तर त्यांना प्रशासना कडून देण्यात येत होते.
हा विषय आमदार डाँ. बालाजी किणिकर यांच्या कानावर जाताच त्यांनी कामगार संघटनेच्या अध्यक्षा सोबत चर्चा केली . आणि त्यांना घेऊन महापालिका आयुक्त डाँ. राजा दयानिधी यांची भेट घेतली.व सकारात्मक चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी सदरचा प्रलंबित प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावतो असे आश्वासन दिले आहे . यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात, भारतीय कामगार-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे,अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस अध्यक्ष चरणसिंह टाक,लेबर फ्रंटचे दिपक दाभणे उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देतांना महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी सांगितले की, महापालिकेचा लेखा विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांची दिशाभुल करत असून शासनाकडे चुकीची माहिती देत आहे.ठेकेदाराला वाढीव बिल देण्यासाठी यांच्याकडे पैसा आहेत . मात्र कामगारांना ७ वे वेतन देण्यासाठी पैसा नाही.ही शरमेची बाब आहे.मनसे आमदार राजू दादा पाटील आणि संघटनेचे अध्यक्ष संदिप देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या संघटनेचा लढा सुरुच राहाणार आहे.तर
अंबरनाथ विधानसभा आमदार बालाजी किणीकर यांनी कामगारांच्या प्रश्नात जातीने लक्ष घातल्या बाबत सर्व कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी त्याचे आभार मानले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम