आदिवाशींच्या जमीनी हडप करणाऱ्या भुमाफियांची सी बी आय द्वारे चौकशी करा . विशालकुमार गुप्ता

उल्हासनगर (रामेश्वर गवई) : उल्हासनगर शहराजवळ जवळ असलेल्या वरप कांबा येथिल आदिवाशीच्या जमीनी हडप करणाऱ्या भुमाफिया यांच्यावर कारवाई होणार असुन त्या जमिनीवर सुरु असलेले अनधिकृत बांधकामे तोडन्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यानी दिले असुन एक वर्षा नंतर जिल्हाधिकारी याना जाग आल्याचे दिसुन आले आहे तर जर का हे बांधकामे १५ दिवसाच्या आत बंद करुन त्या बांधकामावर कारवाई केली नाही तर तीस दिवसाच्या आत सदर प्रकरणात गुन्हे नोंद करुन तपास करन्यास विलंब केला तर पिडीत व्यक्ती आणि अशासकिय सस्था ही सक्षम न्यायालयात जावुन सी बी आय द्वारे या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मांगणी करन्यास स्वतंत्र्य राहील अशी नोटीस राज्याचे पोलिस महासंचालक याना परिहत चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी दिली आहे .

उल्हासनगर शहरा जवळ असलेल्या वरप कांबा या गावातील आदिवाशी च्या जमिनी उल्हासनगर येथील जमिन हडपु लोकानी बोगस कागद पत्राच्या आधारे खरेदी करुन आदिवाशीना रस्त्यावर आणले आहे . तर त्याच जागेवर त्या जमीन हडपु लोकानी अनधिकृत बांधकामे सुरु केली आहेत . तेव्हा परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी सर्व कागद पत्राच्या आधारे त्या बांधकामावर कारवाई करावी म्हणुन जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली दरम्यान या बांधकामावर कोणती ही कारवाई होत नाही म्हणुन विशालकुमार गुप्ता यानी हे प्रकरण दिल्ली येथिल राष्ट्रिय अनुसूचित जाती जमाती आयोगा पुढे नेले तेव्हा आयोगाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि ठाणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ शिवाजी राठोड याना आयोगा पुढे हजर राहन्यास सांगितले . आणि आयोगाने या दोन्ही अधिकाऱ्याना फैलावर घेत आदिवाशी च्या जमिनी हडप करुन त्यावर सुरु असलेले अनधिकृत बांधकामे तोडन्याचे आदेश दिले तेव्हा कुठे एक वर्षा नंतर जिल्हाधिकारी नार्वेकर याना जाग आली असुन त्यानी सदर बांधकामावर कारवाई करन्याचे आदेश कल्याण प्रांत अधिकारी व तहसिदार याना दिले आहेत .
           
दरम्यान विशालकुमार गुप्ता यानी सांगितले की विधान सभेच्या आगामी अधिवेशनात हा विषय घेवुन आवाज उठवन्यात येणार आहे तर सदर बांधकामावर तक्रारदार आणि पिडीत यांच्या समक्ष तोडक कारवाई करुन त्याची व्हिडियोग्राफी करन्याची मांगणी शासना कडे केली आहे .दरम्यान कांबा गांवा जवळ असलेली सर्वे न . १२०/१/१२१/१ अ . ही जमीन उल्हासनगर भाजपाचे नगरसेवक महेश सुखरामानी व त्यांचे सहयोगी प्रकाश बुधरानी . भुमाफिया लाल नोतनदास तनवानी . नरेश रोशनलाल भाटिया . गुणवंत प्रेमराज भंगाळे . यश गोपाल रावलानी. सुरेश तलरेजा.  सतीश तुनिया   यानी सरकारी नियम व कायदा यांचे उल्लघन करुन बोगस कागदपत्राच्या आधारे शेकडो एकर जमीनी हडप केल्या आहेत . तर यात शासनाचे करोडो रुपयाचे मुद्रांक  बुडवले आहे . तर आदिवाशींच्या जमीनी हडप केल्याने गरीब आदिवाशी रस्त्यावर आले आहेत . या प्रकरणात परहित चॅरिटेबल सोसायटीचे विशालकुमार गुप्ता यानी लक्ष घातल्याने हा जमीनीचा मोठा घोटाळा उघड झाला आहे . तेव्हा राष्ट्रिय अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या दणक्याने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे जागी झाले असुन त्यानी पोलिस अधिक्षक डॉ शिवाजी राठोड . प्रांत अधिकारी नितीन महाजन व तहसिलदार दिपक आकडे याना आदेशांवित करुन सदर जागेवर होत असलेले अवैध बांधकामे तोडन्याचे आदेश दिले आहेत .मात्र या आदेशावर आदिवाशी विठ्ठल लक्ष्मण शिद . सुरेश सोमा यांचा विश्वास नसल्याने विशालकुमार गुप्ता यानी राज्याचे पोलिस महासंचालक याना वकीला मार्फत नोटीस पाठवली असुन १५ दिवसाचे आत सदर बांधकामावर कारवाई केली नाही तर तीस दिवसाचे आत पिडीत व्यक्ती आणि अशासकिय सस्था सक्षम न्यायालयात जावुन सदर प्रकरणाचा तपास केंद्राच्या अखत्यारित असलेल्या सी बी आय द्वारे व्हावा या मांगणी करिता स्वतंत्र्य राहील आणि आपली  त्यास सहमती असणार आहे असे नोटीसीत म्हटले आहे .

संबंधित पोस्ट