उल्हासनगरात धोकादायक इमारतीच्या मागचा भाग कोसळला . कोणती ही हानी नाही .
- by Rameshwar Gawai
- Sep 02, 2020
- 509 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात अनेक इमारती धोकादायक आहेत . त्या इमारतीना महापालिकेने नोटीसी सुध्दा बजावल्या आहेत . परंतु इमारतीचे मालक आणि रहिवाशी सुध्दा इमारतीतुन बाहेर पडन्यास इच्छुक नसल्याने इमारती कोसळन्याच्या घटना घडत आहेत . गेल्या हप्त्यात कॅंप ४ येथे व्हिनस रोड वर असलेल्या खाली केलेल्या एका इमारतीचा तिसऱ्या मजल्या वर चा स्लॅप तळ मजल्यावर कोसळला आहे . तर काल दुपारी कॅंप ३ येथील प्रेस बाजारात असलेली लुल्ला टाईल्स या पाच मजली इमारतीच्या पाठी मागील स्लॅप कोसळल्याने दुकानाचे नुकसान झाले असुन मात्र जिवीत हानी वगैरे झाली नाही . परंतु ती इमारत धोकादायक होती मालकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप व्यापारी व नागरिकानी केला आहे
उल्हासनगर कॅंप ३ येथील शिवाजी महाराज चौक येथील प्रेस बाजार असुन हा बाजार अत्यंत गजबजलेला असतो . त्याच ठिकाणी लुल्ला टाईल्स नावाची पाच मजली इमारत असुन ती इमारत धोकादायक असल्याने महापालिकेने त्या इमारतीला खाली करन्याची नोटीस सुध्दा बजावली असल्याचे तेथील एका नागरिकाने सांगितले आहे . दरम्यान काल दुपारी त्या इमारतीच्या मागचा स्लॅप अचानक कोसळला आहे . मात्र यात कोणती ही हानी झाली नसली तरी एका टेंपोचे मात्र नुकसान झाले आहे . ही इमारत धोकादायक आहे हे मालकाला माहीत असताना सुध्दा मालकाने ती इमारत अद्याप ही खाली केली नाही . दरम्यान आता महापालिके कडुन ती इमारत नक्कीच खाली केली जाणार आहे . तर ही घटना मालकाच्या दुर्लक्षा मुळे झाली असल्याचा आरोप व्यापारी व नागरिकानी केला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम