अलविदा प्रणवदा....

स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० वर्षानंतर देशाच्या राजकारणात आज जे परिवर्तन दिसत आहे ते भयावह आहे. कारण आज राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्यामुळे संसदे पासून ग्रामीण भागातील ग्राम पंचायती पर्यंत सगळ्या लोकशाही संस्था गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत लोकशाही साठी ही एक धोक्याची घंटी आहे आणि अशा विपरीत परिस्थितीत देशाचे , इथल्या नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात आलेले असताना प्रणब मुखर्जी यांच्या सारख्या अभ्यासू चारित्र्यवान आणि भारतातील लोकशाही शासन व्यवस्थेसाठी समर्पित असणाऱ्या एका महान नेत्याचे आपल्यातून निघून जाणे खूप वेदनादायी आहे. प्रणबदां यांच्या रूपाने जनतेच्या प्रश्नांची जान असलेला आणि त्या प्रश्नांवर नियमांच्या चौकटीत राहून संसदेत आवाज उठवणारा एक जबाबदार लोकप्रतिनिधी देशाने गमावला आहे. सत्तेच्या राजकारणात केवळ पैसा कमावण्यासाठी आलेल्या नेत्यांची या देशात कमतरता नाही पण सरकारमध्ये जबाबदारीने काम करताना मुजोर प्रशासनावर वचक बसवून देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी समर्पित भावनेने काम करणारा माणूस प्रणवदा यांच्या नंतर भारतीय राजकारणात दिसणार नाही याचेच दुःख आहे. पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील मिराती या छोट्याशा खेड्यातील एका ब्राह्मण कुटुंबात ११ डिसेंबर १९३५ साली जन्मलेल्या प्रणब मुखर्जी यांना देशसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले कारण त्यांचे वडील स्वतंत्रता सेनानी होते आणि स्वातंत्र्य चळवळीत  त्यांना १० वर्ष तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला अशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या प्रणबदांनी विद्यार्थी दशेतच काँग्रेसच्या व्यासपीठावरून आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला मात्र सुरवातीला आपले शिक्षण पूर्ण केले. इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर लॉ केले आणि काही काळ वकिली तर काही काळ प्राध्यापक म्हणूनही काम केले पुढे १९६९ साली त्यांना पहिल्यांदा राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली तर १९७३ साली औद्योगिक विकास खात्याचे ते उपमंत्री झाले. इंदिरा गांधी यांचे ते विश्वासू सहकारी होते त्यामुळे काँग्रेस राजवटीत त्यांना अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळाली १९७५, १९८१, १९९३,१९९९ अशा पाच वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले मात्र इंदिराजींच्या हत्येनंतर जेंव्हा राजीव गांधी यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आली तेंव्हा पक्षातील गटबाजीचा ते बळी ठरले आणि त्यांना पक्षापासून दूर लोटण्यात आले मात्र ते डगमगले नाही त्यांनी स्वतःचा पक्ष काढला मात्र त्यांना फार काळ वाट पाहावी लागली नाही कारण राजीव गांधीना प्रणवदा यांच्या सारख्या कुशल प्रशासक आणि अनुभवी नेत्याची गरज होती त्यामुळे राजीव गांधी यांनी प्रणवदा यांना पुन्हा पक्षात घेतले. २००४ मध्ये जेंव्हा मनमोहनसिंह यांचे यूपीए सरकार सत्तेत आले तेंव्हा प्रणवदा सरकारमध्ये क्रमांक दोनचे प्रमुख मंत्री होते. प्रशासनाच्या बाबतीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह हे जरी काहीसे मवाळ असले तरी प्रणवदा मात्र आक्रमक होते त्यांनी मनमोहनसिंह सरकारमध्ये अर्थ, संरक्षण यासारखी मोठी खाती समर्थपणे सांभाळताना प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याला डोईजड होवू दिले नाही. प्रशासनावर त्यांचा कडक वचक होता त्याच बरोबर परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी जगातील सर्व देशांशी भारताचे संबंध चांगले राहतील याची काळजी घेतली अर्थमंत्री म्हणून तर त्यांचा खूपच बोलबाला झाला. जागतिक बँक असो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो सर्व जागतिक वित्तीय संस्थांना भारताच्या विकास कर्यात हातभार लावण्यासाठी भाग पाडले म्हणून तर युरोमनी पत्रिकेच्या सर्वेक्षणात जगातील सर्व अर्थमंत्र्यांच्या तुलनेत ते सर्वोत्तम ठरले.

 प्रणवदा हे जरी काँग्रेसचे नेते असले तरी इतर पक्षांमध्ये सुद्धा त्यांचा खूप आदर केला जायचा कारण एक चारित्र्यवान,अभ्यासू बुद्धिजीवी राजकारणी असा त्यांचा लौकिक असल्याने सर्वच त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जायचे त्यावेळी पक्षभेद, विचारधारा याच्या पलीकडे जावून ते लोकांना मदत करायचे म्हणून तर २०१२ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना सारख्या हिंदुत्ववादी पक्षाने भाजपा प्रणित एनडीएचे आदेश डावलून प्रणवदा यांना मतदान केले त्यानंतर २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांची राष्ट्रपतीपदाची कारकीर्द सुद्धा लक्षणीय ठरली खून, बलात्कार, दहशतवाद यासारख्या गंभीर गुन्ह्यातील फाशीची शिक्षा झालेल्या २८ दोषींचे दया अर्ज त्यांनी फेटाळले यात संसदेवरील हल्ल्याचा मास्टर माईंड अफजल गुरू, मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील दोषी युसुफ मेनन यांच्या दया याचिकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दोषींच्या दया याचिका रेंगाळत न ठेवता त्या तडकाफडकी निकाली काढणारे प्रणवदा हे देशातील पहिलेच सकारात्मक दृष्टिकोन असलेले राष्ट्रपती होते अशा या महान व्यक्तीने देशातील जनतेचा निरोप घेतल्याने देशाचे मोठे नुकसान झालेय पद्मविभूषण आणि भारतरत्न सारख्या सर्वोत्तम पुरस्काराने गौरविलेल्या या महान नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली!

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट