पेंढरघोळ येथे पाणी योजनेचे भूमिपूजन तर जलकुंभाचे लोकार्पण
- by Mahesh dhanke
- Aug 31, 2020
- 1053 views
शहापुर (महेश धानके) : शहापुर तालुक्यात माजी आमदार पांडुरंग बरोरा व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय निमसे यांच्या आटगाव ग्रामपंचायत मधील पेंढरघोळ नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व नूतन जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला
हातमाग महामंडळ अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाणे जिल्हा श्री प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते पाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले
सदर प्रसंगी ठाणे जि. प.अध्यक्षा सुषमाताई लोणे,माजी आमदार पांडुरंग बरोरा,कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, प.स.सभापती रेश्माताई मेमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती धिर्डे, माजी उपसरपंच अरुण शेलार,उपतालुका प्रमुख गणेश राऊत,खंडुकाका बरोरा,सरपंच पद्मावती बरोरा,माजी उपसरपंच भास्कर बरोरा,उपसरपंच राजेश निमसे,प्रशांत खर्डीकर, पत्रकार जनार्दन भेरे आदी मान्यवर व व ग्रामस्थ उपस्थित होते.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम