
उल्हासनगर महापालिका कोरोनात दंग असल्याचा फायदा घेतला भुमाफियानी केला भुखंड हडप .
- by Rameshwar Gawai
- Aug 31, 2020
- 978 views
उल्हासनगर (रामेश्वर गवई) : कोरोना सारख्या महामारी आजारातून नागरीकांची सुटका व्हावी.यासाठी विविध उपाय योजना करण्यात महापालिका प्रशासन गुंग असताना याचा फायदा घेत भुमाफीयांंनी प्रांत कार्यालयाच्या मदतीने शासकीय भुखंड हडपण्यात दंग असल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे.यामुळे या भुमाफीयांंना आवर घालण्याचा मोठा प्रश्न महापालिका प्रशासना समोर निर्माण झाला आहे.
आँगस्ट महिन्यांत बँ. नंं . २४४ बेवस चौक , उल्हासनगर २ येथिल महापालिकेची शाळा क्र.-३ ची जागा हडप करण्याचा प्रकार शिवसेना आणि मनसेच्या जागृतपणा मुळे उघडकीस आला.त्यानंतर शहरातील बँ. नं. -३३७ सोनारगल्ली येथील शासकीय शौछालय व मोहटादेवी मंदिर येथील आरक्षित भुखंड आणि आता वेदांत काँलेज आणि अंब्रोसिया हाँटेलच्या मध्यभागी असलेला भुखंड हडपण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या तीनही भुखंडाची सनद प्रांताधिकारी कार्यालयातून विविध व्यक्तीच्या नावाने देण्यात आली आहे.
उल्हासनगर हे शहर केंद्र शासनाच्या मालकीचे होते.भारत स्वातंत्र्या नंतर हे शहर म्हणजे तेव्हांचा मिलट्री कँम्प हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या हवाली केला.त्यामुळे या शहराची सर्व मालकी राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. तेव्हा दुस-या कुणाच्या मालकीची जागा असणे शक्य नाही.हे स्पष्ट असतांना प्रांंत कार्यालयातून शासकीय भुखंडाचा मालकी हक्क (सनद) खिरापत वाटावी तशी वाटली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विठ्ठलवाडी येथिल वेदांत काँलेज आणि अम्ब्रोसीया हाँटेलच्या मध्यभागी असलेला हा भुखंड २०,००० स्केअर मीटरचा भुखंड आहे. तो उल्हासनगर महापालिकेच्या मालकीचा आहे. पुर्वी येथे शहरातील घनकचरा उचलणा-या अँन्थोनी वेस्ट हँन्डलिंग कंपनीला त्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी देण्यात आला होता. कचरा उचलण्याचा करार संपल्या नंतर हा भुखंड तसाच पडून होता.कोरोना काळात महापालिका प्रशासन उपाय योजनेत दंग असतांना, भु माफीयांंनी या संपुर्ण जागेला कंम्पाऊड घातले आहे. ही बाब जेव्हा भाजपा नगरसेवक मनोज लासी यांच्या लक्षात येताच त्यांनी महापालिका प्रशासनाला लेखीस्वरुपात तक्रार केली असून हा भुखंड महापालिकेने त्वरीत ताब्यात घेऊन तिथे भटक्या जनावरांसाठी कोंडवाडा तयार करण्याची मागणी केली आहे.
तसेच उपमहापौर भगवान भालेराव आणि रा.काँ.चे प्रदेश सरचिटणीस गट नेते भरत गंगोत्री यांनी देखिल महापालिकेला तक्रार केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त डाँ.राजा दयानिधी आणि प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे.भुमाफीयांंनी शासकीय भुखंड हडपण्याचा लावलेला सपाटा पहाता यांना रोखायचं कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.यापुर्वी पालिकेच्या मालकीचे अनेक भुखंड लाटण्यात आले आहेत.उरलेले भुखंड तरी किमान पालिकेने आपल्या ताब्यात घ्यावेत अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम