
उल्हासनगर शहरात ७ वर्षीय बालिकेवर ४० वर्षीय नराधमा कडून अत्याचार'
- by Rameshwar Gawai
- Aug 31, 2020
- 678 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : नराधमांची विकृती काही थांबताना दिसत नाही. कोवळ्या मुलींवरही लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.असाच घृणास्पद प्रकार घडलाय तो विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दी मधिल चिंचपाडा परिसरात ओळखीचाच नराधमाने एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रशांत उर्फ पोटल्या गोविंद सोनावणे (४०)असे नराधम आरोपीचे नाव आहे.विठ्ठलवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करुन नराधमाला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार, आरोपी हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो तो विवाहीत असुन त्याला एक लहान मुलगी आहे.सात वर्षाची चिमुकली व तिचा भाऊ हे घरासमोर खेळत असता ओळखीचा आरोपी सोनावणे याने चिमुकलीला माझ्या घरी येऊन खेळा असे सांगितले.ओळख असल्यामुळे चिमुकली घरी गेले असता घरात कोणी नसल्याची संधि साधुन आरोपी नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला.यामुळे ही चिमुकली घाबरली व तिच्या वडिलांना घडलेली हकीकत सांगितली, वडिलांनी लागेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रशांत सोनवणे ला अटक करुन बाललैंगिक अत्याचार भा.द.वी कलम ३७६ सह पोक्सो कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सहा.पो.नि.संतोष माने हे करीत असून
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम