उल्हासनगर महापालिका देणार फेरीवाल्याना व्यवसायाकरिता दहा हजार रुपये अनुदान .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरातील सर्व   फेरीवाले हाथगाडी वाले यांची नोंदणी ही गेल्या वर्षापासुन ऑनलाईन सुरु आहे. केंद्र शासन व  महाराष्ट्र शासन यांच्या निर्णया  नुसार उल्हासनगर महानगर पालिके ने  पंतप्रधान राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियाना  अंतर्गत १  सप्टेंबर  २०१९ पासुन   फेरीवाल्यांचे  सर्वेक्षण सुरू केले होते . तेव्हा ज्या मध्ये  जियो मैपिंग पद्धती नुसार   फेरीवाले यांच्या  व्यवसायाच्या जागेवर जाऊन  विनामूल्य नोंदणी करन्यात येत आहे .हे कार्य सस्टेंबर २०१९ पासुन सुरु आहे . तेव्हा शेकडो हाथ गाडीवाले फेरीवाले यांची नोंदणी झाली आहे . 

दरम्यान राज्य शासन व केंद्र शासन यांच्या  योजनेच्या  माधमातुन  उल्हासनगर महानगर पालिका पंतप्रधान राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियाना  अंतर्गत उल्हासनगर येथील  फेरीवाल्याना  दहा हजार  रूपये व्यवसाय करन्या साठी अनुदान म्हणुन देन्यात येणार आहे . अशी माहीती महापालिकेच्या जाहीरातीवरुन मिळाली आहे . 

पंतप्रधान राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियाना अंतर्गत फेरीवाल्याना आत्मनिर्भर बनन्यासाठी  १० हजार रुपये व्यवसायी अनुदान उपलब्ध करुन देन्यात येणार आहे तेव्हा उल्हासनगर महापालिका मुख्यालयाने दिलेल्या जाहीरातीवर नाव व नंबरावर संपर्क करुन मिळणाऱ्या  दहा हजार रुपये अनुदाना करिता संपर्क करण्याचे आव्हान महापालिकेने केले आहे . 

संबंधित पोस्ट