उल्हानगर पोलीस स्टेशन हद्दीत मुली सुरक्षित नाही अपहरण केलेल्या आरोपीला पोलिसांचा पाठींबा.

उल्हासनगर(प्रतिनिधी): ११   ऑगस्ट २०२०  रोजी शाहिंद नासिर शेख याने  अनुसूचित जातीच्या नववी मध्ये शिकत असणारी १४  वर्षीय मुलीला प्रेमाचं आमिष दाखवून राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले असल्याबाबत उल्हानगर पोलीस स्टेशन   मध्ये   कलम ३६३  अन्वये गुन्हा गुन्हा दाखल झाला  आहे . २४  दिवस उलटून सुद्धा अद्याप उल्हासनगर पोलीस मूग गिळून गप्प आहेत  दि. २८  ऑगस्ट २०२० रोजी मुलीच्या आई ला मुलगी शहीद चा  मित्र गंगू सोबत मोटारसायकल वरुन  बिर्ला गेट कडे जाताना   दिसून आली असता सदर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेऊन पोलिसाना माहिती देऊन सुद्धा  पोलिसांनी  १४  वर्षीय अनुसूचित जातीच्या अपहरण मुलीचा शोध घेण्यास टाळाटाळ केला आहे.  असे फिर्यादी ने तक्रारीत म्हटले  आहे.  १४  वर्षीय मुलीचे  २१  दिवस अपहरण होऊन सुद्धा पोलीस हातावर हात देऊन गप्प आहेत.  उल्हासनगर हद्दीत मुली सुरक्षित नाही पोलिसांच्या निष्काळजी पणा मूळे गुन्हेगार मोकळे फिरत आहेत.  त्यामुळे  सदर फिर्यादी यांनी मानवी अन्याय निर्मूलन संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ सुवर्णा ताई कानवडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे सदर १४  वर्षीय अपहरण मुलीचा पोलिसांनी शोध न घेतल्यास  महिला संघटना राज्य भर आंदोलन करणार आहे असे आव्हान सौ सुवर्णा ताई कानवडे यांनी केले  आहे.   अपहरण झालेल्या  मुलीचा  शोध घेण्यासाठी  सौ सुवर्णा कानवडे पोलीस आयुक्त ठाणे व  अनुसूचित जाती जमाती आयोग व गृहमंत्री अनिल देशमुख  राज्य मंत्री बचूभाऊ कडू यांची भेट घेणार आहे  असे फिर्यादीने  यांनी सांगितले आहे. 

संबंधित पोस्ट