शहापुर शहरात भाजपाचे आज घंटानाद

 शहापूर (प्रतिनिधी) राज्यातील देवस्थाने आणि धार्मिक संस्थाने खुली करण्यासाठी भाजपा शहापुर शहर च्या वतीने शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले. या घंटानादात 'दार उघड उद्धवा,दार उघड च्या गजराबरोबरच झोपेत असलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी दारू नको' भक्तीचे दारउघड,मदिरा चालु मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद, भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल या घोषणा या वेळी देण्यात आल्या.
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर, राज्यातील भाविक व सर्वसामान्य नागरिकांकडुन मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली;मात्र राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी आजचे घंटानाद आंदोल करण्यात आले.
भाजपा शहापुर शहर अध्यक्ष श्री विवेकजी नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुरातील मुख्य आंदोलन लक्ष्मीनारायण मंदिरासमोर करण्यात आले त्यात आदिवासी विकास प्रकल्प अध्यक्ष श्री अशोक इरणक ,तालुका अध्यक्ष भास्करशेठ जाधव, जिल्हा नेते काशिनाथ भाकरे ,शहापुर शहर प्रभारी प्रशांत फुले, अल्पसंख्याक आघाडी शहापुर तालुका अध्यक्ष साजिदभाई शेख,शहापुर शहर युवा अध्यक्ष आकाश अधिकारी,व्यापारीआघाडी अध्यक्ष किशोर अग्रवाल,शहर सरचिटणीस शिवाजी लिये, उपाध्यक्ष राहुल पोवळे, जेष्ठ नेते देवेंद्रशेठ शहा, शहापुर शहर पदाधिकारी दर्शनाताई गोतरणे,प्रकाश पाठारी,सचिन केणे,किरण गोतरणे,जयवंत जोशी, राजेश दहीलकर,अब्दुल रहेमान, राकेश दवे,अजय महाजन आदी सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट