स्वराज्य चित्रपट संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी अपर्णाताई खाडे

शहापुर (प्रतिनिधी) कलाकारांच्या न्याय हक्कसाठी लढणाऱ्या स्वराज्य चित्रपट संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर शहापुर मधील सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे यांची निवड करण्यात आली आहे  स्वराज्य चित्रपट संघटना कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून  कलाकार , तंत्रज्ञ , गायक , लेखक , निर्माते , दिगदर्शक , नाट्य संस्था , प्रोडक्शन हाऊस , यांच्या साठी ही संघटना काम करते अनेक कलाकारांची फसवणूक होते ती फसवणूक थांबावी या साठी संघटनेच्या माध्यमातून काम केलं जाते . 

ग्रामीण भागातील कलाकारांना स्थानिक ठिकाणी प्राधान्य मिळावं या साठी संघटनेच्या वतीने काम केलं जात असून कलाकारांना सरकारने ५० वर्षानंतर पेन्शन चालू करावी या साठी ही संघटना प्रयत्नशील आहे, 

चित्रपट व नाट्य  क्षेत्रांशी निगडित काम करणाऱ्या व्यक्तींना कलाकारांना प्रत्येक हॉस्पिटल मध्ये अल्प दरात उपचार व्हावे महिला कलाकारांवर होणारा अन्याय थांबवा या साठी संघटनेच्या वतीने प्रयत्न चालू असतात अनेक ठिकाणी  फिल्म , सिरीयल , या साठी ऑडिशन घेतले जातात त्या साठी अनेक ठिकाणी त्यांच्या कडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जाते ती थांबावी या साठी संघटनेच्या वतीने प्रयत्न चालू असतात


अनेक लोकांना संघटनेच्या माध्यमातून धान्य किट देण्यात आले

स्वराज्य चित्रपट संघटना फक्त महाराष्ट्र मध्ये नाही तर गुजरात , गोवा , कर्नाटक , आंध्र प्रदेश , हैद्राबाद , दिल्ली या ठिकाणी सुद्धा संघटनेचे पदाधिकारी काम करत आहेत संघटनेचे अध्यक्ष पत्रकार प्रकाश यादव यांनी अपर्णा ताई खाडे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड केली,या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांच्या उन्नती साठी मी कार्यरत राहणार असून ठाणे पालघर जिल्ह्यातील कलाकारांना या क्षेत्रात करिअर करता यावे यासाठी मी पुढाकार घेणार असल्याचे अपर्णा खाडे यांनी दैनिक आदर्श महाराष्ट्रशी बोलताना सांगितले

संबंधित पोस्ट