
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदक नेमण्याची मागणी
- by Mahesh dhanke
- Aug 28, 2020
- 1101 views
शहापूर (प्रतिनिधी) : शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी शवविच्छेदक नसल्याने वेळेत शवविच्छेदन होत नसून या रुग्णालयात तातडीने शवविच्छेदक नेमण्याची मागणी भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष साजिद शेख यांनी केली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील व शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी याना दिलेल्या निवेदनात साजिद शेख यांनी ही मागणी केली आहे,निवेदनात म्हंटले आहे की शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा तालुका असून ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र येथील मयत रुग्ण किंवा मुंबई - नाशिक हायवे किंवा इतर रस्त्यावरील अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले जाते मात्र येथे कायमस्वरूपी शवविच्छेदक नसल्याने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना तासनतास ताटकळत बसावे लागते,शिवाय अनेक वेळा पैसे मोजावे लागत असल्याचा आरोपही साजिद शेख यांनी आपल्या निवेदनात केला आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम